नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात अचान कोरोनारुग्णसंख्येने उसळी घेतल्याने कोरोनाविरोधात सुरक्षाकवच असलेल्या लशीचा बूस्टर डोस देण्यासाठी विशेष मोहीम चालविण्याचा विचार वरिष्ठ अधिकारी गंभीरतेने करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली असून लवकरच मिक्स आणि मॅच करून बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे.
वेल्लोरमधील क्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयातर्फे (सीएमसी) तयार केल्या जात असलेल्या ट्रायल डेटाच्या आधारावरून आधीपासून मंजुरी मिळालेल्या कोविड-१९ लशीचा बूस्टर डोस मिक्स आणि मॅच करायचा आहे की नाही, हे ठरविण्यास सरकार दोन आठवड्यात सक्षम होईल, असे घटनाक्रमाबद्दल परिचित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीएमसीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय औषधे महानियंत्रक (डीसीजीआय)ने लशीचा बूस्टर डोसच्या परीक्षणाची मंजुरी दिली होती. आता सीएमसी लवकरच केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेच्या (सीजीएससीओ) तज्ज्ञांसमोर सादर करण्यासाठी पुरेसा डेटा तयार करत आहे. त्यानंतर लस मिक्स करणे योग्य ठरेल का नाही, हे निश्चित करू शकता येणार आहे.
लशीच्या या अभ्यासाचे नेतृत्व करणारे सीएमसीचे वरिष्ठ तज्ज्ञ आणि प्राध्यापक गगनदीप कांग म्हणाले, की अभ्यासातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आम्हाला मागील आठवड्यात आरोग्य मंत्रालयाच्या स्क्रिनिंग समितीकडून परवानगी मिळाली होती. या टेस्टचा डेटा निर्मिती करण्यासाठी दोन आठवड्यांची आवश्यकता आहे.
ते म्हणाले, की नमुन्यांचे परीक्षण सुरू झाले आहे, आगामी एक किंवा दोन आठवड्यात प्रासंगिक डेटा निर्मिती करण्यास आम्ही सक्षम होणार असून, तो सुरक्षा आणि देखरेख मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर आम्ही सीडीएससीओकडे डेटा सादर करणार आहे. आम्ही यापूर्वीच याबद्दल औषधे नियामकांकडून वेळ मागितली आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय औषधे नियामकांनी वेल्लोर येथील सीएमसीला अभ्यास करण्याची परवानगी दिली होती. मार्चमध्ये प्रारंभिक निष्कर्षांच्या विश्लेषणासाठी लसीकरणाबाबत राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समुहाकडे (एनटीएजीआय) सामायिक केला होता. एनटीएजीआयने मागील बैठकीत अँटिबॉडी निष्क्रिय करण्याविषयीचा अधिकचा डेटा मागितला होता.