विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या साथीने आजाराने हाहाकार उडविला असून आबालवृद्धांना या संसर्गाचा मोठा धोका आहे. प्रत्येक देशात कोट्यावधी लोकांना याची लागण झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचवेळी कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असून त्याकरिता उपाययोजना म्हणून त्यांनी दरवर्षी लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अंदाज वर्तविला आहे की कोविड -१९ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना ( वृद्ध व्यक्ती ) सर्वाधिक धोका असतो आणि त्यातील वेगवेगळ्या प्रकारांपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी लसचा बूस्टर डोस घ्यावा लागतो.
मोडर्ना, फायझर सारख्या कंपन्या आधीच सांगत आहेत की, उच्च पातळीवरील प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असेल, परंतु अद्याप याबद्दल कोणताही पुरावा नाही. डब्ल्यूएचओने हृदयरोग, सर्दीचे आजार, मधुमेह यासारख्या आजाराच्या व्यक्तींसाठी वार्षिक बूस्टर डोस आवश्यक मानला आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्यांसाठी दर दोन वर्षांनी बूस्टर डोसची आवश्यकता आहे.
एका अहवालानुसार, पुढील वर्षापर्यंत १२ अब्ज कोव्हीड -१९ लस डोस जागतिक स्तरावर तयार केल्या जातील. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड असोसिएशन्सने (आयएफपीएमए) यंदाच्या ११ अब्ज डोसच्या अंदाजापेक्षा ते किंचित जास्त असेल. या कोरोना विषाणूने आतापर्यंत ४० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना विषाणूची लस भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कमी प्रभावीपणे दिसून येत आहे. तथापि, यातून दिलासा मिळाला आहे की, या लसीमुळे मृत्यूची जोखीम कमी होते आणि गंभीर आजारापासून बचाव होतो.
जागतिक आरोग्य संघटनेनेही विषाणूच्या या नव्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत संपूर्ण जगातील सुमारे ८५ देशांमध्ये या प्रकाराचा शिरकाव झाला आहे. २९ देशांमध्ये या बदललेल्या प्रकारामुळे सर्वात जास्त विनाश होण्यास सुरवात झाली आहे.
आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले की, आपल्या देशातील अनेक संस्था कोरोनाचे बदलणारे स्वरूप यावर सतत रात्रंदिवस संशोधन करत असून आतापर्यंत भारतात त्यांना कोरोनाच्या या बदललेल्या प्रकाराबद्दल काहीही आढळले नाही. आपल्या देशात डेल्टा व्हेरिएंटचे बरेच रूग्ण देखील वाढले आहेत.