अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड सार्वजनिक वाचनालयास पवित्र गुरुपौर्णिमाच्या शुभ पर्वावर प्रा. मुकेश मिसर सर यांचे कडून ग्रंथ भेट देण्यात आली.
मनमाड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूलचे (के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल) संस्थापक व प्राचार्या संवेदनशील लेखक ,कवी मुकेश मिसर यांनी आज पवित्र गुरुपौर्णिमा च्या शुभ पर्वा वर त्यांचा स्व लिखित➖ THE ENGLISH Manual ➖हा रुपये ३९० किंमतीचा इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी बोलणे या शिवाय इंग्रजी विषय कशा पध्दतीने शिकवावा याची उपयुक्त मांडणी असणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ मनमाड सार्वजनिक वाचनालय भेट दिला. मनमाड सार्वजनिक वाचनालयचे अध्यक्ष नितीन पांडे आणि सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या ग्रंथ भेटीचा वाचनालया तर्फे स्वीकार केला. एका उत्तम शिक्षकाने शिक्षक व विद्यार्थ्यांन साठी लिहिलेला एक उत्कृष्ट गंथ असे वर्णन करीत वाचनालयाचे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या प्रसंगी केले. प्रा मिसर या ग्रंथ भेटी बद्द्ल आभार प्रगट केले. या वेळी केआरटी विद्यालयचे राजेंद्र सोनवणे सर मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी आदी मान्यवर उपस्थित होते.