इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध बॉलिवूड गायक कृष्णकुमार कुननाथ अर्थात के के (वय 53) यांचे कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना निधन झाले. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. खासकरुन बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. के के यांच्या निधनाने सर्वत्र श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास के के यांची लाईव्ह कॉन्सर्ट कोलकाता येथे सुरू होती. दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात के के यांनी सुमारे एक तास विविध गाणी म्हटली. याच कार्यक्रमा दरम्यान त्यांना त्रास जाणवू लागला. ते हॉटेलमध्ये परतले पण अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
केके यांची पत्नी आणि मुलगा हे दिल्लीहून कोलकाता येथे पोहोचले आहेत. दोन कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी ते कोलकात्यात आले होते. गायक बाबुल सुप्रियो म्हणाले की, “के के सोबत माझ्या अनेक वैयक्तिक आठवणी आहेत. आम्ही आमची कारकीर्द एकत्र सुरू केली. तो एक अद्भुत व्यक्ती होता. प्रसिद्ध गायक केके यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
गायक के के यांना उपचारासाठी घेऊन जातानाचा व्हिडिओ
https://twitter.com/tirthaMirrorNow/status/1531735713569460226?s=20&t=n6AOUk4GaqNfh00Qjn4Xlw
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, ‘प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या गाण्यांमध्ये अभिव्यक्तीची व्यापकता आहे. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.’
गायक के के यांचे कॉन्सर्टमधील शेवटच्या गाण्याचा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1531711710473887744?s=20&t=kzChnNdmCDCF76tUSfu-4g
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले, “केके हे अतिशय प्रतिभावान आणि अष्टपैलू गायक होते. त्यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे आणि भारतीय संगीताची मोठी हानी झाली आहे. आपल्या तेजस्वी आवाजाने त्यांनी असंख्य संगीतप्रेमींच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून शोक आहे. कुटुंब आणि चाहते. शांती शांती”
गायक के के यांच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ
https://www.facebook.com/SingerKKofficial/photos/a.10155906884116220/10158845484026220/?type=3
केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिले, “प्रसिद्ध गायक श्री कृष्णकुमार कुननाथ यांच्या आकस्मिक निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या सुरेल आवाजासाठी आणि सुरेल गायनासाठी ओळखले जाणारे, श्री केके यांचे निधन हे संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. “