सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील रोहिला गावच्या रस्त्या लगत संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडल्याने दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदगाव येथे हलविण्यात आले. पावसाने बऱ्याच दिवसांच्या विश्रांती दिल्यामुळे परिसरात पाऊसाची नितांत गरज भासू लागली होती,दुपार पडूनच ढगाळ वातावरण होते, त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली यात रोहिला रस्त्या लगत बोलठाण शिवारात येणाऱ्या संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडली त्यात कल्पना संजय बारवकर, ललीता प्रभाकर बारवकर या दोन महिला जखमी झाल्या त्यांना तातडीने नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन मालेगांवी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.