सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्रींचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असते. खासकरुन बॉलीवूडमधील तरुण अभिनेत्रींविषयी चाहते अत्यंत जागरुक असतात. आज आपण अशाच तरुण अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. त्यात खासकरुन जान्हवी कपूर पासून सारा अली खान आणि दिशा पटणी या चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे जाणणार आहोत…
जान्हवी कपूर
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिचे प्रचंड चाहते आहेत. खासकरुन श्रीदेवीला चाहते जान्हवीच्या रुपात पाहतात. २०१८ साली जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. २४ वर्षीय जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी तब्बल ५ कोटी रुपये मानधन घेते.
कियारा अडवाणी
अभिनेत्री कियारा अडवाणीचे पदार्पण फ्लॉप ठरले. ’फगली’ या चित्रपटापासून कियाराने बॉलीवूड मध्ये अभिनयाची सुरवात केली. कालांतराने कियाराने स्वतःचे मोठे नाव कमवले. ‘एम एस धोनी’ या चित्रपटात कियाराने धोनीची बायको साक्षीची भूमिका केली होती.२९ वर्षीय कियारा एका चित्रपटासाठी २-३ कोटी रुपय घेते. कियाराला ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ साठी प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.
सारा आली खान
२९ वर्षीय सारा आली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटात सारा आली खान सोबत सुशांत सिंग राजपूतने काम केले होते. साराने नुकतेच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सारा एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेते. सारा आली खान ही सैफ आली खान आणि अमरिता सिंगची मुलगी आहे.
आलिया भट्ट
दिग्दर्शक महेश भट्ट यांची आलिया भट्ट ही कन्या आहे. २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या आलिया भट्टने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती तिच्या आगामी ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेत आहे.
दिशा पटणी
बॉलीवूडची फिट आणि हिट अभिनेत्री दिशा पटणीने २०१६ मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामधून पदार्पण केले. २९ वर्षीय दिशा पटणी एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेते. ‘धोनी’ व्यतिरिक्त दिशाच्या हिट लिस्टमध्ये ‘राधे’,’भारत’, आणि ‘मलंग’ या चित्रपटांचा समावेश आहे.