मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील कलाकार तथा अभिनेते चित्रपटात काम करून कोट्यावधी रुपये कमवतात, त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स देखील भरावा लागतो. परंतु काही कलाकार इन्कम टॅक्स भरण्यास टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करतात. या उलट काही कलाकार मात्र नियमितपणे इन्कम टॅक्स भरतात.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहेत. हे त्यांच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत हे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आयकर भरणारे कलाकार बनले आहेत. तर अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. नुकतेच प्राप्तिकर दिनानिमित्त आयकर विभागाने या दोन्ही अभिनेत्यांचा गौरव केला आहे.
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका वर्षात चार ते पाच चित्रपट करतो. अक्षयच्या एका चित्रपटाचे प्रमोशन संपत नाही तोच तो पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करतो. कामाच्या दरम्यान, तो कुटुंबासह सुट्टीसाठी वेळ काढतो. तो बॉलिवूड मधला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे.अक्षयला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यांच्या टीमने त्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतला. पाच वर्षांपासून तो भारतातील सर्वाधिक करदात्यां पैकी एक आहेत. अक्षय सध्या जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकसाठी इंग्लंडमध्ये शूटिंग करत आहे.
अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतो. चित्रपटांशिवाय अक्षयच्या उत्पन्नाचे इतरही स्रोत आहेत. त्याची एकूण संपत्ती 369 कोटी रुपये आहे. अक्षय कुमारची भारतातच नव्हे तर कॅनडामध्येही बरीच संपत्ती आहे. तो एका खासगी जेटचाही मालक आहे, ज्याची किंमत सुमारे 260 कोटी रुपये आहे.
अक्षय कुमार लवकरच ‘रक्षा बंधन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट दि. 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अक्षय सध्या टिनू देसाई दिग्दर्शित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सन 2018 मध्ये, अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सातव्या क्रमांकावर होता. त्यानंतर फोर्ब्स मॅग्झीनने त्याला आपल्या यादीत सातव्या क्रमांकावर ठेवले. त्याच्या एका चित्रपटाची फीही कोटींमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अक्षयने त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटासाठी 60 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते. त्याचप्रमाणे एका जाहिरातीसाठी तो 8 ते 10 कोटी रुपये घेतो.
Bollywood Tax Payer Celebrity Actor Income Tax Akshay Kumar Rajnikant