इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलीवूडची लोकप्रिय आणि गुणी गायिका म्हणून श्रेया घोषाल ओळखली जाते. तिच्या आवाजाचे देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. नुकतीच तिने इन्स्टा पोस्टद्वारे एक ब्रेकिंग न्यूज दिली. जी पाहून तिच्या चाहत्यांना तिची फारच काळजी वाटते आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया सध्या परदेश दौऱ्यावर आहे. तिथे सातत्याने तिच्या कॉन्सर्ट सुरू आहेत. अशाच एका कॉन्सर्टनंतर श्रेयाचा आवाजच गेला होता. पण, डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर तिचा आवाज परतला असून आपल्या सुमधुर आवाजाने ती रसिकांचे मन रिझवू शकते.
आपल्या चाहत्यांसोबत हा अनुभव शेअर करताना श्रेया भावूक झाली. श्रेया म्हणते, ओरलँडो येथे झालेल्या कॉन्सर्टनंतर माझा आवाजच गेला होता. मला काहीच म्हणणे शक्य होत नव्हते. पण माझ्या पाठीशी असलेल्या सदिच्छा आणि डॉ. समीर भार्गव यांचे योग्य उपचार यांच्या साहाय्याने मला मिळालेली दैवी देणगी पुन्हा मिळवण्यात यश आले आहे. आता मी पुन्हा गाऊ शकते. असे श्रेया या पोस्टमध्ये लिहिते. या उपचारानंतर मी न्यूयॉर्कमध्ये मी सलग तीन तासांची कॉन्सर्ट केली. या शहराने मला खूप प्रेम दिल्याचंही श्रेया पोस्टमध्ये लिहिते. श्रेयाचा अमेरिका दौरा आता संपला आहे. आयुष्यात काहीही झाले तरी, सो मस्ट गो ऑन ही विचारसरणी अवलंबायला हवी, असेही श्रेया सांगते.
https://twitter.com/SonaSsg/status/1594307390567948288?s=20&t=8vCWctahY-xa93bSb9Hvvg
श्रेयाने इन्स्टावर ही पोस्ट टाकताच तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काहींनी तिला आरामाचा सल्ला दिला तर काहींनी ती बरी झाल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. श्रेयाच्या बाबतीत असं काही होणं, अगदी काही तासांसाठी सुद्धा, हे चाहत्यांच्या पचनी पडण्यासारखं नाही. त्यामुळेच चाहते देखील यावर तीव्रतेने व्यक्त होत आहेत. चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित श्रेया घोषाल ही बॉलीवूडमधील आघाडीची गायिका आहे. तिच्या गाण्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘सारेगमप’ या रिऍलिटी शोची ती विजेती होती. हिंदीसोबतच अन्य भाषांमध्येही तिची अनेक लोकप्रिय गाणी आहेत.
https://twitter.com/shreyaghoshal/status/1575417894238048256?s=20&t=7vyjtkB7xJs6ORuoRyj77Q
Bollywood Singer Shreya Ghoshal USA Concert Accident Treatment Health