इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांचा आज वाढदिवस आहे. आज त्या 57 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. अलका यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीला आपके प्यार में, जिंदगी बन गए, दिल के बदले सनम, हर दिल जो प्यार करेगा यासह अनेक हिट गाणी दिली आहेत. अलका यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कोलकात्याच्या रेडिओ स्टेशनवर गाणे सुरू केले. यानंतर तिला वयाच्या १४ व्या वर्षी करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला. त्यांची आजवरची वाटचाल खुपच विलक्षण आहे,
अलका याज्ञिक यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे राहणाऱ्या गुजराती कुटुंबात झाला. अलकाच्या वडिलांचे नाव धर्मेंद्र शंकर आणि आईचे नाव शोभा याज्ञिक आहे. विशेष म्हणजे अलकाची आई देखील एक उत्तम गायिका आहे. अलका यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण आईकडूनच घेतले. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी अलका यांनी रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून आपली जादू चालवायला सुरुवात केली. त्याच वेळी, त्यांना वयाच्या 14 व्या वर्षी करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला.
वयाच्या 14 व्या वर्षी अलका यांना ‘पायल के झंकार’ मधील ‘थिरकट अंग लचक झुक्की’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडले. मग काय, अलका यांच्यासाठी कामाची ओढ सुरू झाली. यानंतर 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘लावारीस’ या चित्रपटातील ‘मेरे अंगने’ या गाण्याला अलका यांनी आवाज दिला.
1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ गाण्यानंतर अलका यांना पार्श्वगायिका म्हणून ओळख मिळाली. ‘एक दो तीन’ नंतर अलका यांनी आतापर्यंत जवळपास 700 चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. पार्श्वगायक म्हणून त्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गायिकेला तिच्या उत्कृष्ट गायनासाठी सात फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.
अलका याज्ञिक यांच्याकडे 80 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 60 कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका गाण्यासाठी अलका १२ लाख रुपये घेतात. मात्र, त्यांनी काही काळ कोणतेही गाणे गायले नाही. अलका याज्ञिक सध्याच्या काळात संगीतातील बदल हे काम न मिळण्याचे कारण मानतात. अलका यांनी नीरज कपूरसोबत १९८९ मध्ये लग्न केले, पण दोघेही गेल्या २७ वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
Bollywood Singer Alka Yadnik Birthday Life Journey