इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्यांपैकी एक असलेले सल्लू मिया आजही एकटेच आहेत. अधूनमधून त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठत असतात. ऐश्वर्या राय सोबतची त्यांची लवस्टोरी मात्र चांगलीच गाजली होती. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची जुनी लवस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन यांचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यात त्यांनी सलमान विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामुळेच ते दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत.
सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप होऊन दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरीही या दोघांचे एकमेकांबरोबरचे जुने फोटो, व्हिडीओ किंवा त्यांनी एकमेकांबद्दल केलेली वक्तव्ये अधूनमधून चर्चेत असतात. अलीकडेच ऐश्वर्याचा सलमानबद्दलच्या भावना व्यक्त करतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
सिमी ग्रेवालचा चॅट शो ९० च्या दशकात खूप लोकप्रिय होता. या शोमध्ये अनेक स्टार्स हजेरी लावायचे आणि मनमोकळ्या गप्पा मारायचे. १९९९ मध्ये, ऐश्वर्या राय देखील शोच्या एका एपिसोडमध्ये दिसली होती. त्यावेळी ती तिच्या करिअर आणि चित्रपटांबद्दल खुलेपणाने बोलली होती. याच शोदरम्यान सिमीने ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता. ‘तुझ्या मते इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी आणि गॉर्जिअस पुरुष कोण आहे?’
त्यावर ऐश्वर्याने बराच विचार करून सेक्सीऐवजी चार्मिंग विशेषण वापरू शकतो का, असा प्रतिप्रश्न केला होता. सिमीने त्याला नकार दिला. ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील पुरुषांमधून निवडलं गेलं आहे, अशा व्यक्तीचे नाव घ्यावेच लागेल, असे ऐश्वर्या म्हणाली. त्यानंतर तिने लाजत सलमान खानचं नाव घेतलं होतं. हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. आणि पुन्हा हे दोघे चर्चेत आले आहेत.
Bollywood Actor Salman Khan Actress Aishwarya Rai Bacchan Video Viral