मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – नैराश्य किंवा डिप्रेशन लवकर न समजणारा परंतु तरीही गंभीर असलेला आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो, बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह नुकताच शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. त्याने या संवादा दरम्यान खुलासा केला की, तो डिप्रेशनचा बळी ठरला आहे.
सदर मानसिक आरोग्याबद्दल बोलताना या सिंगरने असेही सांगितले की त्याला स्लीप अॅप्निया नावाच्या गंभीर आजाराने देखील ग्रासले आहे. बादशाहने शिल्पा शेट्टीला सांगितले की, माझ्या आयुष्याची प्राथमिकता मानसिक आरोग्याला आहे. दररोजच्या दबावानंतर, मानसिक शांतता मला लक्झरी असल्यासारखे वाटते.
ज्याप्रकारे आपण दररोज दबाव अनुभवत आहोत, या परिस्थितीत माझ्यासाठी मानसिक शांतता आहे. यापुर्वी मी वाईट काळातून गेलो आहे. माझ्यासाठी जेव्हा मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा मी क्लिनिकल नैराश्यातून म्हणजे एक चिंता विकारातून गेलो आहे, म्हणून मला माहित आहे की, मला तिथे पुन्हा जायचे नाही.
दरम्यान, तो पुढे म्हणाला, अशा व्यक्तीसोबत राहावे लागेल जे तुम्हाला आनंदी करू शकतात. तसेच तुम्हाला नाही म्हणायला शिकावे लागेल आणि तुम्हाला हो म्हणायला शिकावे लागेल. तुम्हाला आनंदी राहावे लागेल, कारण खूप दबाव आहे. आम्ही आमचे जीवन तणावपूर्ण आहे. मग आम्ही तक्रार करतो की आम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही. तुम्हाला गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील. जवळच्या व्यक्तींना स्वतःजवळ ठेवा आणि एवढेच.”
तसेच बादशाहने त्याच्या शारीरिक आरोग्याबद्दलही सांगितले तो म्हणाला, माझ्याकडे वजन कमी करण्याची अनेक कारणे होती. लॉकडाऊनच्या काळात आम्ही कोणतेही शो केले नाहीत आणि त्यानंतर आता अचानक सर्व काही खुले झाले. जेव्हा मी स्टेजवर गेलो तेव्हा मला समजले की, माझ्यात स्टॅमिना नाही.
यापुर्वी स्टेजवर 120 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ परफॉर्म करताना थांबावे लागत असे. पण आता माझ्याकडे तेवढा स्टॅमिना नव्हता. मी फक्त 15 मिनिटांतच दमलो होतो. या बादशाहने आपल्या कारकिर्दीत ‘डीजे वाले बाबू’, ‘जुगनू’, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, ‘लडकी कर गई चुल’, ‘तम्मा-तम्मा अगेन’ अशी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.