इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील हॉट आणि कमिटेड जोड्यांपैकी एक महत्त्वाची जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. ही दोन्ही नाव कायम चर्चेत असतात. सध्या हे चर्चेत आहे ते त्यांनी घेतलेल्या नवीन घरामुळे. काही महिन्यांपूर्वी रणवीरने मुंबईतील वांद्रे भागात ‘सागर रेशम’मध्ये एक लक्झरी आपार्टमेंट विकत घेतलं आहे. मुख्य म्हणजे दीपवीरचं हे आपार्टमेंट शाहरुख खानच्या ‘मन्नत’ शेजारी आहे. त्यामुळे शाहरूख आणि दीपवीर आता एकमेकांचे शेजारी होणार आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर रणवीरने हे घर खरेदी केलं आणि यासाठी त्याने तब्बल ११९ कोटी रूपये मोजले आहेत.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रणवीर म्हणाला की, चार वर्षांपूर्वी दीपिका आणि मी लग्न केलं. लग्नानंतर मी तिच्या घरी राहायला गेलो. चार वर्षांपासून मी तिच्याच घरात राहतोय. पण आता आम्ही आमचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. हे आम्ही खरेदी केलेलं आमचं पहिलं घर आहे आणि म्हणून आमच्यासाठी ते खास आहे.
दीपिका प्रचंड बिझी असते. मी सुद्धा माझ्या कामात बिझी असतो. तरीही दीपिकाला घरात राहायला फार आवडतं. अनेकदा आम्ही घरीच एकमेकांबरोबर वेळ घालवणं पसंत करतो. हे नवं घर आम्हा दोघांसाठी परफेक्ट आहे. संसाराची आवड असल्याने दीपिका स्वत: घर सजवते आहे. एखादी लहान मुलगी तिचं डॉल हाऊस सजवते, अगदी त्याच इंटरेस्टने दीपिका घर सजवते आहे. मी तिला यावरून अनेकदा चिडवतो सुद्धा. तिच्यासोबत या घरात राहणं, तिच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं मला आवडेल.
त्यांचं हे नवं घर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळ आहे. ११ हजार २६६ चौरस फुटात असलेलं हे अपार्टमेंट चार मजल्यांचं आहे. इमारतीच्या १६ व्या, १७ व्या, १८ व्या आणि १९ व्या माळ्यावरच्या या घरासाठी रणवीरला १८ पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. तर या घरापोटी शासनाच्या तिजोरीत देखील भर पडली आहे. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला ७ कोटी १३ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे.
Bollywood Ranveer Singh New Home Property