सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भावाचा मोठा परिणाम चित्रपट क्षेत्रावर झाला आहे. अनेक मोठे चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत, ज्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. मात्र कोविडमुळे चित्रपटांच्या प्रदर्शनावर संकट आले. अशा परिस्थितीत काही मोठ्या चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या आहेत. हे बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या नव्या तारखा काय आहेत ते पाहूया…
राधे श्याम
प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. राधे श्याम हा प्रभासच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची सर्व प्रेक्षक वाट पाहत आहेत. 11 मार्च 2022 रोजी राधे श्याम रिलीज होणार आहे.
RRR
बाहुबलीच्या यशानंतर प्रेक्षक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा बदलली आहे, परंतु आता हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
लाल सिंग चड्ढा
आमिर खान आणि करीना कपूर खान अभिनीत लाल सिंग चड्ढा हा चित्रपट यापूर्वी फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार होता. पण काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट आता बैसाखीच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे.
भूल भुलैया 2
अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या भूल भुलैयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा परिस्थितीत चाहतेही त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. त्याच्या दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. हा चित्रपट आधी मार्चमध्ये रिलीज होणार होता.हा चित्रपट 20 मे रोजी रिलीज होणार आहे.