बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘७२ हुरे’ हा चित्रपट वादात का सापडला? असं काय आहे त्यात?

by India Darpan
जून 30, 2023 | 5:18 am
in मनोरंजन
0
72 hooren

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘७२ हुरें’ हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असून हा निर्णय ऐकून सहनिर्माते अशोक पंडित संतापले आहेत. धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा चेहरा समोर आणणारा हा नवीन चित्रपट आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर आता असाच आणखी एक चित्रपट येतोय. ‘७२ हुरें’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटावरुन सुरुवातीपासूनच वाद सुरू असून आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणित करण्यास नकार दिला आहे. हा निर्णय ऐकून अशोक पंडित संतापले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटातील काही विशेष दृश्ये, कुराण संदर्भ आणि प्राणी कल्याणाचा हवाला देऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘७२ हुरें’ चित्रपटाच्या ट्रेलरला मान्यता देण्यास नकार दिला आहे. चित्रपट निर्मात्यांनी असा युक्तिवाद केला की चित्रपटाला आधीच सेन्सॉर प्रमाणपत्र असल्याने, तेच ट्रेलरला देखील लागू केले जावे. हा ट्रेलर २८ जून रोजी डिजिटल स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी इंग्रजीसह १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

निर्णयावर अशोक पंडितांची नाराजी
सेंट्रल बोर्डाच्या निर्णयामुळे चित्रपट इंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला आहे. यामुळे सर्जनशील स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपवर वादाला तोंड फुटले आहे. हे प्रमाणपत्र नाकारल्याबद्दल सह-निर्माते अशोक पंडित म्हणाले, “आम्ही एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत, ते दृष्य सेन्सर बोर्डाने काढण्यास सांगितले आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, धर्माच्या नावाखाली कशाप्रकारे ब्रेनवॉशिंग केले जाते, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. विशेषत: जिहादच्या नावाखाली आत्मघाती हल्ले करणाऱ्यांचे चित्रण ‘७२ हुरें’ मध्ये केले आहे.

नावाचे महत्त्व काय?
अशोक पंडित म्हणाले, “तुम्ही मौलवी किंवा काझीकडून ७२ हुरें शब्द ऐकला आहे का? खरं तर ही वस्तुस्थिती आहे. मी काश्मीरचा आहे, तिथे प्रत्येक गल्लीत हा शब्द बोलला जातो. त्यामुळे हा चित्रपट धर्माच्या विरोधात आहे असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. या चित्रपटातून आम्ही फक्त दहशतवादावर बोलत आहोत. दहशतवाद माझ्याइतका जवळून कोणी पाहिला नसेल. मी ज्या भागातून येतो तिथे मी रात्रंदिवस दहशतवाद पाहिला आहे. त्यावर आधारित या चित्रपटाचे नाव आहे.”

चित्रपटाला विरोध
काही मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय व्यक्तींनी या चित्रपटाचा निषेध केला आहे. काहींनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये, असा युक्तिवाद केला आहे. या चित्रपटात हकीम अलीच्या भूमिकेत पवन मल्होत्रा आणि बिलाल अहमदच्या भूमिकेत आमीर बशीर दिसणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवीन वस्त्रोद्योग धोरणात होणार अनेक बदल; बघा, कोणते आहेत ते?

Next Post

वारी पंढरीची (भाग – १४) उस डोंगापारी रस नोहे डोंगा |काय भुललासी वरलिया रंगा| || संत चोखामेळा ||

India Darpan

Next Post
sant chokhamela e1688052129599

वारी पंढरीची (भाग - १४) उस डोंगापारी रस नोहे डोंगा |काय भुललासी वरलिया रंगा| || संत चोखामेळा ||

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011