गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हो, अभिषेक बच्चनने खोटी अंगठी देऊन केले होते ऐश्वर्या रायला प्रपोज

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
abhishek bachhan

 

सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुत्र आणि अभिनेता अभिषेक बच्चन विषयी अनेक बाबी फार उजेडात येत नाहीत. अभिनेता म्हणून त्याला फारशी चमक दाखविता आलेली नसल्यामुळेही त्याच्याविषयी फार चर्चा होत नाही. काही जणांचे मत आहे की, त्याची कामगिरी ही अमिताभ यांच्या दिग्गज कामगिरीपुढे अगदीच किरकोळ वाटते. तसेच, सतत अनेक जण अमिताभ आणि अभिषेक यांच्याशी तुलना करतात. आज आपण अभिषेक यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

अभिषेक बच्चन चा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी मुंबई येथे बॉलीवूड बादशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या घरी झाला. अभिषेकने 2000 साली ‘रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले होते, पण तो बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. सगळ्यांनाच माहीत आहे की, अभिषेकची चित्रपटांच्या बाबतीत सुरुवातीची कामगिरी चांगली राहिली नाही. अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी प्रेक्षकांमध्ये त्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते. एकदा एका मुलाखतीत अभिषेक ने कबूल केले होते की त्याची सुरवातीची कामगिरी काही चांगली ठरली नव्हती. तो चित्रपटांचे स्क्रिप्ट ना वाचताच चित्रपट साइन करायचा, ही सवय त्याला खूप महागात पडली होती. त्यामुळे 4 वर्षात त्याचे 17 चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर अभिषेकने स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. पा, धूम, दोस्ताना, गुरु सारखे त्याचे अनेक चित्रपट त्यामुळे सुपरहिट ठरले.

अभिषेकने स्वत: अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबतच्या एका क्षणाचा खुलासा केला होता. २००७ मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचा एकत्रित चित्रपट ‘गुरु’ चे शुटींग चालू होते. टोरंटोमध्ये गुरू या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला त्याच्या हॉटेल रूमच्या बालकनीत प्रपोज केले होते. खरंतर, त्यावेळी अभिषेक ऐश्वर्यासोबत ‘गुरु’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि त्याला अंगठी खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही, म्हणून त्याने प्रपोज करण्यासाठी शुटींग मध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट अंगठीची वापर केला होता. अभिषेक बच्चनने 2007 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे लग्न होते. या जोडप्याच्या लग्नाला 12 वर्षे झाली असून त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजूनही तितकेच दिसून येत आहे. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. यामध्ये प्यार के ढाई अक्षर , कुछ ना कहो, उमराव जान, धूम 2, गुरु, सरकार राज, रावण यांचा समावेश आहे. याआधी 10 वर्षांपूर्वी दोघेही रावण चित्रपटात एकत्र दिसले होते. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे पण तिचे वय त्यांच्या प्रेमात कधीच आले नाही. आज अभिषेक-ऐश्वर्या बॉलीवूडच्या आदर्श जोडप्यांपैकी एक आहे.

मुलाखतीत अभिषेकने एका घटनेबद्दल सांगितले जी तो आजपर्यंत विसरलेला नाही. अभिषेकने सांगितले की, जेव्हा त्याचा ‘शरारत’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद जाणून घेण्यासाठी तो थिएटरमध्ये गेला होता. मध्यंतरात चित्रपट पाहून एक महिला बाहेर आली आणि तिने येऊन त्याला थप्पड मारली आणि म्हणाली – अभिनय थांबव,तू तुझ्या कुटुंबाचे नाव खराब करत आहेस. असे म्हटले जाते की, चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी अभिषेक एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. पण नंतर त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील ‘खाइके पान बनारस वाला’ या आयकॉनिक गाण्याच्या डान्स स्टेप्स अभिषेक बच्चनच्या लहानपणापासून घेतगेल्याचे सांगितले जाते.

अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. तसेच, नुकताच तो ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटामध्ये दिसला होता याला सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. हेय दोन्ही चित्रपट OTTवर रिलीज झाले होते. आता येत्या काही दिवसांत अभिषेक बच्चन मोस्ट अवेटेड ‘दासवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तुषार जलोटा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दिग्दर्शक म्हणून तुषारचा हा पहिलाच चित्रपट आहे. ‘दासवी’, ‘स्त्री’, ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती दिनेश विजन करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पॅनकार्डशी निगडीत हा नियम माहीत नसेल, तर तुम्हाला होऊ शकतो १० हजाराचा दंड

Next Post

डासांना या तीन रंगांचे असते सर्वाधिक आकर्षण, तर हे चार रंग नावडणारे

Next Post
प्रातिनिधीक फोटो

डासांना या तीन रंगांचे असते सर्वाधिक आकर्षण, तर हे चार रंग नावडणारे

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011