इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड जगताचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकावर एक असे बहुतेक बिग बजेट चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातो आहे किंवा मग ते बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. आता प्रदर्शना आधीच गाण्यांनी धुमाकूळ घातलेल्या एका चित्रपटाची स्टोरीच लीक झाल्याची घटना घडली आहे. सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर पाहून प्रत्येकाने अंदाज लावला आहे की मौनी रॉय या सिनेमात खलनायिकेच्या भूमिकेत आहे. पण आता सोशल मीडियावर सिनेमाची स्टोरी लीक झाल्याचा दावा केला जात आहे. या सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत मौनी नाही तर आलिया भट्ट आहे.
‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातील केसरीया या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. १२ दशलक्षपेक्षा जास्त लोकांना हे गाण आवडलं आहे. त्याचे विविध रिल्स बनवले जात आहेत. २०२२ मधील बहुप्रतिक्षित सिनेमांमधील एक आहे ‘ब्रह्मास्त्र’. या सिनेमाच्या कथेविषयी आता दावे केले जात आहेत. या दाव्यांमध्ये भरपूर ड्रामा आहे. टीझर-ट्रेलर वरून हे आधीच स्पष्ट झालं आहे. रणबीर कपूर या सिनेमात शिवाच्या भूमिकेत आहे. जो अग्नि अस्त्र आहे. येत्या १० सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे.
https://twitter.com/BrahmastraFilm/status/1565300362386345984?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g
ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन व्यक्तिरेखा शिवाला हे समजावताना दिसत आहे की, तो स्वतः अग्नी अस्त्र आहे. मौनी रॉय यामध्ये खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत आहे आणि ती ब्रह्मास्त्रवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या सैन्यासोबत दिसत आहे. याउलट सर्वांनीच ट्रेलरमध्ये पाहिलं की, आलिया भट्ट एक साधी-सरळ मुलगी आहे. रणबीर कपूरनं साकारलेल्या शिवा या व्यक्तिरेखेवर तिचं प्रेम असतं. पण नेटकऱ्यांनी मात्र आता दावा केला आहे की, आलियाच खरी खलनायिका आहे. ती शिवाशी गोड बोलून त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी येते.
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांनुसार, सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत ईशा म्हणजे आलिया भट्टची व्यक्तिरेखा आहे. ती अग्नी अस्त्र म्हणजे शिवाच्या सहाय्याने इतर अस्त्रांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आलिया देखील स्वतः एक अस्त्र असते,ज्याचा खुलासा सिनेमाच्या शेवटी होतो. आता लीक कथानकात किती सत्य आहे हे चित्रपटाच्या प्रदर्शनंतरच समजेल.
https://twitter.com/BrahmastraFilm/status/1564516837697630209?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g
Bollywood Film Brahmastra Story Leak
Entertainment Alia Bhatt Ranbir Kapoor