इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ हा अत्यंत लोकप्रिय शो. या शो मध्ये पाहुणे म्हणून आलेल्या कलाकारांना तो नेहमीच प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. पण, अशीच काहीशी वेळ आपल्यावरही येऊ शकते, याचा त्याने विचारच केला नसावा. त्यामुळेच अशी वेळ समोर आल्यावर मात्र, प्रश्नांना सामोरे जाताना त्याची गोची झाली. केवळ स्टार किड्सला लॉन्च करत असल्याचा आरोप करणवर सातत्याने केला जातो. त्यातच अलीकडे अनेकांनी करणच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला आहे. तरीही बॉलीवूडमधील तो चर्चेतला व्यक्ती आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करणने महेश भट्ट यांची मुलगी म्हणजेच आलिया भट्टला लॉन्च केले होते, त्यावेळीही करणवर सर्वच स्तरातून मोठी टिका झाली होती. त्यानंतर आलियाला बाॅलिवूडचे अनेक चित्रपटही मिळाले. ऍमेझॉन मिनी टीव्हीवरील कॉमेडी शो ‘केस तो बनता है’ च्या नुकत्याच झालेल्या भागात करण जोहर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जनतेचे वकील असलेले रितेश देशमुख या शोमध्ये करणला काही खास प्रश्न विचारतात. विशेष म्हणजे रितेशच्या काही प्रश्नांमुळे करणची गोची होताना स्पष्ट जाणवलं. ‘कुछ कुछ होता है’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या करणच्या चित्रपटातील काही डायलॉग्जवरून रितेशने करणची चांगलीच खिल्ली उडवली.
यावेळी कलाकारांना कास्ट करण्यावर करणने केला मोठा खुलासा केला आहे. प्रश्न विचारत रितेश करणला म्हणतो की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी पाहता? म्हणजे त्याचे दिसणे की त्याचे व्यक्तिमत्त्व? रितेशच्या या प्रश्नावर काही वेळ करण शांत बसतो, आणि म्हणतो की, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…मात्र, कधी कधी मी टॅलेंट, टॅलेंट, टॅलेंट शोधण्याचाही प्रयत्न करत असल्याचे करणने सांगितले. मात्र या प्रश्नामुळे काही काळ थबकला असल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bollywood Director Karan Johar Question Film Actor Acting
Coffee With Karan Entertainment TV Show Riteish Deshmukh