मुंबई – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा कहर देशातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तसेच या दोन अभिनेत्रीनंतर सोहेल खानची पत्नी सीमा खानचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच वेळी बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूर कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, या सर्वांनी एकत्र पार्टी केली होती, त्यानंतर एकामागून एक सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. सीमा खानला लागण झाल्याच्या एका दिवसानंतर आता तिचा मुलगा योहानही कोरोनाच्या विळख्यात आला आहे. आता हे प्रकरण समोर आल्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता सोहेल खानची इमारत सील केली आहे. सध्या या इमारतीत १०० हून अधिक नागरिक राहतात.
करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीनंतरच करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी झाली, त्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. करीना-अमृता यांच्यानंतरच सीमा खान आणि अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरही कोरोनाच्या विळख्यात आली होती.
या सेलिब्रिटींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर आता अनेक सेलिब्रिटींना धोका वाटत आहे. कारण या पार्टीत मलायका अरोरा, करिश्मा कपूर आणि मसाबा गुप्ता देखील सहभागी झाल्या होत्या. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूर कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे. तसेच एका पाठोपाठ एक सेलीब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने सोशल मीडियासह बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यानंतरच महीप कपूर, करीना कपूर, अमृता अरोरा आणि सीमा खान यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह असल्याची चर्चा रंगली होती. तसेच करण जोहरला कोरोनाचे हॉटस्पॉट म्हटल्यावर त्याला राग आला असून करण जोहरने माहिती दिली आहे की त्याचा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि आपल्या शहराच्या सुरक्षेसाठी त्यांच्या प्रयत्नांना सलाम करतो. असेही त्यांनी म्हटले आहे.