मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवुड कलाकार विलासी जीवन जगतात त्यामुळे अनेक चाहते त्यांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. या कलाकारांच्या महागड्या कपड्यांपासून ते महागड्या कारपर्यंत, सेलिब्रिटींचे विलासी जीवन नेहमीच चाहत्यांना आकर्षित करते. सेलिब्रिटींच्या भव्य जीवनशैलीत त्यांच्या आलिशान बंगल्यांचाही समावेश होतो. या रिपोर्टमध्ये बॉलिवूडमधील 10 सेलिब्रिटींच्या टॉप बंगल्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…
शाहरुख खान
किंग ऑफ रोमान्स म्हटला जाणारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याबद्दल सर्वांना माहिती आहे. शाहरुख खानच्या बंगल्याचे नाव मन्नत असून तो वांद्र्याच्या समुद्राजवळ आहे. या बंगल्याची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुखचे चाहते मन्नतच्या बाहेर जाऊन फोटो क्लिक करून घेतात.
नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकीचे मुंबईतील नवीन घर काही काळापूर्वी पूर्णपणे तयार झाले असून त्याचे नाव नवाब ठेवले आहे. नवाजुद्दीनच्या नव्या घरातील ‘नवाब’चे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवाबचा नवाब वर्सोवा येथे आहे.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचे नाव किनारा आहे, तो खूप महाग असल्याचे बोलले जात आहे. शिल्पाचा बंगला जुहू येथे आहे. जगभरातून आणलेल्या वस्तूंनी शिल्पाने तिचे घर सजवले आहे.
अजय देवगण व काजोल
बॉलीवूडचा उत्कृष्ट अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती आहे. अजय काजोलचे शिवशक्ती जुहू येथे आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 60 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे एकापेक्षा जास्त बंगले आहेत. अमिताभ कुटुंबासोबत जलसामध्ये राहत असून जलसा जुहू येथे आहे. ‘सत्ते पे सत्ता’ हिट ठरला तेव्हा हा बंगला अमिताभ यांना रमेश सिप्पीने दिला होता.
अक्षय कुमार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा जुहू बीचवर डुप्लेक्स बंगला आहे. हे घर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने डिझाइन केले आहे. ट्विंकल अनेकदा तिच्या घरातील वेगवेगळ्या भागांतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
फरहान अख्तर
फरहान अख्तर हा एक मल्टी टॅलेंटेड स्टार आहे. कारण फरहान एक अभिनेता, निर्माता, गायक, संगीतकार आणि लेखक आहे. फरहानच्या बंगल्याचे नाव विपश्यना असून तो सध्या वांद्रे येथे आहे. विपश्यना 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.
रेखा
एव्हरग्रीन ब्युटी म्हणवल्या जाणार्या अभिनेत्री रेखा सध्या वांद्र्याच्या बंगल्यात हजर आहेत. शाहरुख-सलमानच्या घराजवळच रेखाचा बंगला आहे. रेखाचा बंगला उंच बांबूंनी वेढलेला आहे. तसेच समोर समुद्राचे सुंदर दृश्य आहे.
हृतिक रोशन
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा बंगला पारसही जुहूमध्ये आहे. पारसची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे. पारस, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या छटासह, खूप लक्झरी आहे.
सैफ अली खान
सैफ अली खानचा आलिशान बंगला गुरुग्राममध्ये आहे. 10 एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेल्या या पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. त्याच वेळी, या बंगल्याची किंमत सुमारे 800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.