मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात विमा उतरवणे खूप महत्त्वाचे मानले जात आहे. विम्यासंदर्भात जनजागृती झाल्याने अनेक नागरिक विमा उतरवण्याला प्राधान्य देत आहे. त्यात आपली करमणूक करणारे बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत. परंतु अनेक सिनेतारकांनी आपल्या शरीराच्या अवयवांचाही विमा उतरवला आहे. एका गायकाने आपल्या बोटांचा, तर एका अभिनेत्याने आपल्या आवाजाचा विमा उतरवला आहे.
रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत यांची प्रत्येक अदा कमाल असते. त्यांना स्क्रिनवर पाहिल्यावर त्यांचे चाहते शिट्ट्या आणि टाळ्या थांबवत नाहीत. रजनीकांत यांनी आपल्या आयकॉनिक आवाजाचा विमाच नव्हे, तर कॉपीराइट करून घेतला आहे.
सनी देओल
सनी देओल याचे नाव बॉलिवूडमधील चांगल्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याच्या उमेदीच्या काळात सनी देओलने आपला जोरदार आवाज आणि अॅक्शनने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. सनी देओलनेसुद्धा आपल्या आवाजाचा विमा उतरवला आहे.
प्रियंका चोप्रा-जोनस
बॉलिवूडमधील देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्राची परदेशातही जादू आहे. प्रियंकाने नुकताच एंडिंग थिंग्स नावाच नवा हॉलिवूड चित्रपट केला आहे. प्रियंकाने आपल्या स्माईलचा विमा उतरवला आहे.
मनिषा लांबा
यहां या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मनिषा लांबा सध्या सक्रिय दिसत नसली तरी तिचे आज अनेक चाहते आहेत. मिनिषा लांबा हिने आपल्या हिप्सचा विमा उतरवला आहे.
नेहा धुपिया
मनिषा लांबाच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिनेसुद्धा हिप्सचा विमा उतरवला आहे. एका मुलखतीत नेहाने ही गोष्ट मान्य केली होती. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजच्या हिप्सचा विमा उतरवणाऱ्या कंपनीकडूनच नेहाने विमा उतरवला आहे.
जॉन अब्राहम
केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहम यानेसुद्धा हिप्सचा विमा उतरवला आहे. दोस्ताना या चित्रपटात जॉन अब्राहम हिप्सच्या एका सिनमुळे चर्चेत आला होता.
राखी सावंत
मनिषा लांबा, जॉन अब्राहम, नेहा धुपिया यांच्यासह हिप्सचा विमा उतरवणाऱ्या कलाकारांच्या यादीत राखी सावंतच्या नावाचाही समावेश आहे. राखी नुकत्याच झालेल्या बिग बॉस १५ मध्ये सहभाग घेतला होता.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडमधील शहंशाह अमिताभ बच्चन यांचा दमजदार आवाज आणि जोरदार स्टाइलचा प्रत्येक जण चाहता आहे. अमिताभ यांनी आपल्या आवाजाचा विमा उतरवला आहे.
मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये बोल्डनेसची नवी व्याख्या बनवली. मर्डर चित्रपटात पदार्पण करणाऱ्या मल्लिकाने हॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडली. मल्लिकाने आपल्या संपूर्ण शरीराचा विमा उतरवला आहे.
अदनान सामी
अदनान सामीमध्ये गाण्यासह अनेक वाद्य वाजवण्याची कला आहे. तो ३५ वाद्य वाजवू शकतो. अदनान सामीने आपल्या बोटांचा विमा उतरवला आहे.