इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नावात काय आहे, असे म्हटले जाते. परंतु नावातच सर्व काही आहे, असे देखील विचार मांडले जातात. कारण प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या नावावरून ओळखला जातो. त्यामुळे आजच्या आधुनिक काळात बहुतांश पालक आपल्या मुलांची नावे आगळीवेगळी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यातच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी तर त्यासाठी खूपच वैशिष्ट्यपूर्ण नावे शोधून काढली आहेत.
जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्याला काही अर्थ नाही. दुसरीकडे, जेव्हा नावाचा विचार केला जातो. तेव्हा नावाचे सौंदर्य त्याच्या अर्थामध्ये दडलेले असते. आजकाल गेल्या काही वर्षांमध्ये, मुलांमध्ये अद्वितीय व आगळी वेगळी नावे ठेवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. चला जाणून घेऊ या की, सेलिब्रिटींनी आपल्या मुलांची नावे काय ठेवली आहेत.
मालती मेरी
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी ठेवले आहे. या अनोख्या नावाच्या अर्थाबद्दल बोलायचे झाले तर मालती हे एका फुलाचे नाव आहे, ज्याचा सुगंध खूप चांगला आहे. याचा अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. त्याच वेळी, मेरी म्हणजे समुद्राचा थेंब आणि खूप गोड.
नील
काजल अग्रवाल आणि गौतम यांनी त्यांच्या मुलाचे नाव नील ठेवले आहे. नावाचा अर्थ आयरिशमध्ये चॅम्पियन होतो, तर या नावाचा हिंदीत अर्थ निळा असा होतो.
गोल
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या बाळाचे घरगुती किंवा लाडचे नाव गोल ठेवले आहे. आता भारती आणि हर्ष आपल्या मुलाचे अधिकृत नाव काय ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, परंतु गोल नावाचा अर्थ गुबगुबीत आकार आहे.
लिआना
देवोलीना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी त्यांच्या मुलीचे नाव लियाना ठेवले आहे. या नावाचा अर्थ चमकदार असा आहे.
सना
पूजा बॅनर्जी आणि संदीप सेजवाल यांनी त्यांच्या मुलीचे नाव सना ठेवले आहे. या नावाचा अर्थ प्रशंसा आणि प्रतिभावान आहे.
टीवीशा
श्वेता अग्रवाल आणि आदित्य नारायण यांनी त्यांच्या मुलीचे नाव टीवीशा ठेवले आहे. या नावाचा अर्थ आनंद आणि प्रकाश आहे.