सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आनंदी राहण्याचा एक मंत्र आहे आणि तो म्हणजे चार पंज्यांचा आपला फरी फ्रेंड. अभ्यासकांनी वेळोवेळी, हे निदर्शनास आणले आहे की पाळीव प्राणी तणाव, नैराश्य आणि अगदी तुमचा रक्तदाब सुद्धा कमी करू शकतो. खरं तर,बॉलीवूड तारे देखील त्यांच्या आकर्षणांपासून मुक्त नाहीत. त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या चार पायांच्या मित्रांसोबतचे क्षण नेहमी शेअर करतांना दिसतात. दक्षिणेपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्सकडे मांजरीपासून कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी आहेत. सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांचे पाळीव प्राणी देखील खूप उच्च देखभाल करतात.
सलमान खान:
मायसन आणि मायजान यांचे निधन झाल्यानंतर, सलमानकडे मायलोव्ह आणि मायजान (ज्याला त्याने त्याच्या पहिल्या पाळीव प्राण्यावरून नाव दिले) नावाचे कुत्रे आहेत. सलमान खानकडे मोगली नावाचा एक लॅब्राडोर रिट्रीव्हर, सेंट बर्नार्ड नावाचा सेंट आणि नुकताच मरण पावलेला वीर नावाचा फ्रेंच मास्टिफ देखील आहे.
विजय देवरकोंडा:
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता विजय देवरकोंडा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतो. त्याच्याकडे एक सायबेरियन हस्की डॉग देखील आहे. ज्याचे नाव स्टॉर्म आहे, त्याला स्टॉर्म देवराकोंडा असेही म्हणतात. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सोनू सूद:
सोनू सूद आपल्या सामाजिक कार्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याला प्राण्यांवरही खूप प्रेम आहे. त्याच्याकडे एक नाही तर अनेक कुत्रे आहेत. ज्यांच्यावर तो मनापासून प्रेम करतो. तो सोशल मीडियावर आपल्या पाळीव प्राण्यांसोबतचे फोटोही शेअर करत असतो.
श्रद्धा कपूर:
श्रद्धा कपूरकडे लासा अप्सो जातीचा कुत्रा आहे. जिच्यावर ती स्वतःहून जास्त प्रेम करते. त्याचे नाव शिलो आहे. तिने तेच वाढदिवस देखील साजरा केला . त्याचे काही क्षण तिने तिचं सोशल मिडिया वर शेअर केले होते.
https://twitter.com/SreedharSri4u/status/1486705505535873027?s=20&t=5Cyq0Tzcts7ePFS17lJEwQ
पुलकित सम्राट :
पुलकित सम्राटकडे हस्की जातीचा कुत्रा आहे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करतो. त्याच्या कुत्र्याचे नाव ड्रोगो आहे, ड्रोगोचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. कामानंतर तो त्याच्या कुत्र्यासोबत खूप खेळतो.
जान्हवी कपूर :
जान्हवीच्या पाळीव प्राण्याचे नाव पांडा आहे. ती स्वतः त्याला फिरायला घेऊन जाते. टी पांडा सोबतचे फोटो सोशल मिडियावर नेहमी ह्सेअर करतांना दिसते. जान्हवी सोबत तिची बहिण ख़ुशी सुद्धा पांडा सोबत टाइम स्पेंड करतांना दिसते.
धनुष:
धनुषने गेल्या वर्षीच दोन सुंदर पाळीव प्राणी दत्तक घेतले आहेत. त्याचे कुत्रे सायबेरियन हस्की जातीचे आहेत, एकाचे नाव किंग आणि दुसऱ्याचे नाव कॉँग असे ठेवले आहे. त्याने त्याच्या कुत्र्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मलायका अरोरा:
मलायका अरोरा तिच्या कुत्र्यासोबत पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती स्वतः त्याला फिरायला घेऊन जाते. तिला तिचा कुत्रा इतका आवडतो की तिचा मुलाने देखील तिला विचारले की तुला कॅस्पर (कुत्रा) जास्त आवडतो की मी. ज्यावर तिने सांगितले की, तिला दोघेही तिच्या मूला प्रमाणे आहे.