मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूडमधील सेलिबेटी यांच्या खासगी आयुष्यसंबंधी सिनेरसिकांना नेहमीच उत्सुकता असते, विशेषतः कोणत्या सेलिब्रिटीचे कोणा सोबत प्रेम प्रकरण सुरू आहे? कोण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे? किंवा कोणाचे कोणाबरोबर लग्न होणार आहे? इतकेच नव्हे तर कोणाचे लग्न कोणत्या परदेशी व्यक्ती सोबत झाले आहे? याची नेहमी चर्चा होत असते. विशेषतः एखाद्या अभिनेत्रीने किंवा अभिनेत्याने परदेशी व्यक्ती सोबत लग्न केले तर त्याची अधिक चर्चा रंगते. 2022 या वर्षाला असाचा लग्नाचा हंगामही म्हणता येईल.
मोहित रैना
रैना याच्या लग्नाच्या चर्चेने या वर्षाची सुरुवात झाली असताना, या वर्षी इतर अनेक सेलिब्रिटी देखील लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार आहेत. असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी परदेशीला व्यक्तीला आपला लाइफ पार्टनर म्हणून निवडले आहे.
प्रीती झिंटा
बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ (गालावर खळी.. ) असलेली प्रीती झिंटा हिचा नवरा अमेरिकन आहे. प्रिती हिने 2016 मध्ये जीन गुडइनफ यांच्याशी लग्न केले. जीन हे व्यवसायाने आर्थिक विश्लेषक आहेत.
शशी कपूर
बॉलिवूडचे दिग्गज नट शशी कपूर यांची पत्नी परदेशी होती. शशी कपूर यांनी 1958 मध्ये अभिनेत्री जेनिफर कँडलसोबत लग्न केले. शशी आणि जेनिफर यांची पहिली भेट पृथ्वी थिएटरमध्ये झाली होती.
सुचित्रा पिल्लई
या यादीत बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा पिल्लईचेही नाव आहे. सुचित्राचे लग्न डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या लार्स काल्डसनशी झाले आहे. लार्स हा व्यवसायाने संगणक अभियंता असून या जोडप्याला अनिका नावाची मुलगी आहे.
अरुणोदय सिंग
अभिनेता अरुणोदय सिंगची पत्नी कॅनडाची आहे. अरुणोदयने 2016 मध्ये ली एल्टन हिच्याशी लग्न केले. अरुणोदय आणि ली यांची पहिली भेट सोनम कपूरच्या ‘आयशा’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ली ऑल्टन आता गोव्यात कॅफे चालवते.
सेलिना जेटली
बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली आणि पीटर हाग यांचा विवाह 2011 साली झाला होता. सेलिना आणि पीटरने ऑस्ट्रियामध्ये लग्न केले. सेलिना आणि पीटरच्या मुलांची नावं विन्स्टन आणि विराज आहेत.
प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा डंका आता परदेशातही वाजत आहे. प्रियांकाचा पती निक जोनास हा परदेशी आहे. निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. नुकतीच या जोडप्याने एक गोड बातमी देखील दिली आहे
लिसा रे
अभिनेत्री लिसा रे हिचा नवराही परदेशी आहे. लिसा रे हिच्या पतीचे नाव जेसन डेनी आहे आणि तो लेबनॉनचा आहे. लिसा रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.