मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट तयार होत असतात, या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया मोठी असते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार कास्टिंग किंवा कलाकारांची निवड होय. तसेच कलाकारांची निवड झाल्यावर ते चांगल्या प्रकारे काम करून चित्रपट प्रसिद्ध करतात, तसेच त्यांना ही चांगली प्रसिध्दी मिळते, कोणत्याही चित्रपटाच्या यशात किंवा फ्लॉपमध्ये स्टारकास्टची भूमिका महत्त्वाची असते. कोणत्याही दिग्दर्शकाला कोणत्याही चित्रपटाची सर्वोत्कृष्ट कलाकारांची अपेक्षा असते, परंतु अनेक वेळा सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणाने शूटिंगच्या मध्येच चित्रपट सोडतात, काही वेळ कलाकार चित्रपट साईन केल्यावर त्याची शूटिंग होण्यापूर्वीच तो सोडतात त्याचा फटका सर्वांनाच बसतो. असे काही चित्रपट आणि कलाकार पाहू या…
कहो ना प्यार है:
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल, ज्यांना बॉलीवूडचे ग्रीक गॉड्स म्हटले जाते, या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण अमिषाच्या आधी करीना कपूरने याचे शूटिंग सुरू केले, मात्र काही शूटिंगनंतर अभिषेक बच्चनसोबतच्या ‘रिफ्युजी’च्या शूटिंगमुळे करिनाने चित्रपट सोडला.
राबता:
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती सेनन यांनी राबता या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली होती, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवली नाही. तरीही सुशांत-क्रितीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. परंतु या चित्रपटात आधी आलिया भट्टला कास्ट करण्यात आले होते, मात्र शूटिंगच्या तारखांमध्ये काही अडचणींमुळे अभिनेत्रीला चित्रपटाचे शूटिंग मध्येच सोडावे लागले होते.
चलते चलते:
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी स्टारर ‘चलते चलते’ हा अजूनही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे, पण या चित्रपटासाठी पहिली पसंती ऐश्वर्या राय होती. ऐश्वर्याने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते, मात्र सलमान खानमुळे तिला शूटिंग सोडावे लागल्याचे बोलले जात आहे. असे म्हटले जाते की, सलमान चित्रपटाच्या सेटवर तमाशा करण्याच्या विचारात होता.
कबीर सिंग:
कबीर सिंग या चित्रपटाने शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या करिअरला नवी उंची दिली आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ‘मरजावां’साठी तारा सुतारियाने हा चित्रपट सोडला असला तरी त्यानंतर ‘प्रीती’साठी तारा सुतारियाची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हाफ गर्लफ्रेंड:
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. पण या चित्रपटासाठी पहिली पसंती होती सुशांत सिंग राजपूत. मात्र राबताच्या कमिटमेंट्समुळे सुशांत हा चित्रपट करू शकला नाही, असे म्हटले जाते.
राम लीला:
संजय लीला भन्साळी यांचा ‘राम लीला’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी या चित्रपटात आपली मोठी छाप पाडली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. करीना कपूर खान या चित्रपटासाठी पहिली पसंती होती, मात्र तारखांच्या वादामुळे दीपिकाला या चित्रपटात संधी मिळाली.
जोधा अकबर:
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा जोधा अकबर प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचे शूट रणबीर कपूरने सुरू केले होते, मात्र काही कारणामुळे ते मध्येच अपूर्ण राहिले. याचा उल्लेख खुद्द रणबीरने ‘बॉम्बे वेल्वेट’च्या प्रमोशन दरम्यान केला होता.