मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या काळात शिक्षण घेणे ही काळाची गरज नव्हे, तर मूलभूत हक्क आणि कर्तव्य बनलेले आहे. त्यामुळेच सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण करण्यात आले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुण-तरुणींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते, परंतु काही जणांना परिस्थितीत आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे ते शक्य होत नाही. मात्र श्रीमंत घरातील मुलांना उच्च शिक्षण घेणे सहज शक्य असते, त्यातही सेलीब्रेटी असेल तर त्याला ती गोष्ट अत्यंत सोपी असते. बॉलिवूड स्टार्स पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात. चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अगदी लहान – सहान तपशील जाणून घ्यायचे असतात. सिनेस्टार्सच्या करिअरबद्दल अनेकांना माहिती असते. पण त्यांचे शिक्षण किती झाले आहे याबाबत असंख्य अनभिज्ञ असतात. त्यामुळेच आज आपण काही महत्त्वाच्या सेलिब्रेटी आणि त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊ या…
आलिया भट्ट
आलिया भट्टने लहान वयातच चित्रपटांमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. त्यामुळे अशा परिस्थितीत तिने बारावीनंतर पुढील शिक्षण घेतले नाही.
कतरिना कैफ
कतरिना कैफने लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. ती लहान असताना ती अनेकदा तिच्या आईसोबत देशोदेशी प्रवास करत असे. त्यामुळे तिला अभ्यास करणे खूप कठीण होते. वयाच्या १४ व्या वर्षी जेव्हा तिला मॉडेलिंगची ऑफर आली तेव्हा तिने तिचे शालेय शिक्षण सोडले.
कंगना रणावत
कंगना रणावतने तिचे शालेय शिक्षण चंदीगड येथून पूर्ण केले. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी तिने वैद्यकीय चाचणी दिली होती, मात्र त्यामध्ये ती नापास झाली होती, त्यानंतर तिने आपला विचार बदलला.
करीना कपूर
करीना कपूरला वकील व्हायचे होते. तिचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील वेल्हम स्कूल व मुंबईतील जमनाबाई स्कूलमधून झाले. त्यानंतर तिने मिठीबाई कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचे दोन वर्षे शिक्षण घेतले, परंतु पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही. मग तिने लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण मध्येच शिक्षण सोडले.
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्यावर तिने त्यावर लक्ष केंद्रित केले. तिने ग्रॅज्युएशनसाठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्येही प्रवेश घेतला पण ती पूर्ण करू शकली नाही.
श्रद्धा कपूर
अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपू बोस्टन युनिव्हर्सिटीत शिकत होती, मात्र त्याच काळात जेव्हा तिला पहिला चित्रपट मिळाला होता. तेव्हा श्रद्धा या चित्रपटासाठी भारतात परत आली आणि तिचा अभ्यास अपूर्ण राहीला.
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर देखील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे की, तिने आपले कॉलेज पूर्ण केले नाही. ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी साहित्य विषय घेतला होता, तो तिने मध्येच सोडला.
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्राने मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन २००० मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आणि त्यानंतर तिने फिल्मी करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले.
अर्जुन कपूर
अभिनेता अर्जुन कपूरला त्याच्या शिक्षणाबाबत सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. तो बारावीत नापास झाला होता, त्यानंतर त्याने पुढील शिक्षण घेतले नाही. आणि तो अभिनयाद्वारे चित्रपटांकडे वळला.
अक्षय कुमार
अक्षय कुमारने दिल्लीतील गुरु नानक देव खालसा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र तो अभ्यास चालू ठेवू शकला नाही, परंतु काही काळ थायलंडमध्ये शेफ म्हणून काम केले, त्यानंतर त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. भारतात परतल्यावर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर सुरू केले
आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आमिरने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. काही कारणास्तव पुढील शिक्षण तो घेऊ शकला नाही.