मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड मधील कलाकारांची जीवनशैलीच वेगळी असते. सर्व सामान्य नागरिकांपेक्षा त्यांच्याकडे प्रचंड पैसा असल्याने ते काहीही खरेदी करू शकतात, असे म्हटले जाते. त्यांच्याकडे असलेले बंगले, कार, कपडे, दागिने यांच्याविषयी नेहमी चर्चा होत असते. तसेच रसिकांना देखील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या जीवनशैलीचे नेहमीच आकर्षण वाटत असते. सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार अत्यंत महागड्या अशा कार आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या लक्झरी राइड्ससाठी देखील ओळखले जातात. यातील अशा निवडक ९ सेलेब्सबद्दल जाणून घेऊ या, ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आहे.
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खानची लग्झरी लाइफस्टाइल सर्वांनाच आकर्षित करते. शाहरुख खानचा मन्नत बंगला नेहमीच चर्चेत असतो. तसेच Rolls-Royce Phantom ही शाहरुखच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.
हृतिक रोशन
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन त्याच्या नृत्य, अभिनय आणि उत्कृष्ट शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. हृतिक रोशनकडे रोल्स रॉयस घोस्ट सीरीज II आहे, ज्याची किंमत 7 कोटी रुपये आहे.
अजय देवगण
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन देखील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आहे. अजय देवगणकडे रोल्स रॉइस कलिनन आहे, ज्याची किंमत सुमारे 6.95 कोटी रुपये आहे.
प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नावाचे ‘नाणे ‘ किंवा चलन परदेशातही चालते. कारण प्रियांका हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय आहे आणि ती सध्या बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही चर्चेत आहे. प्रियांकाकडे रोल्स रॉयस घोस्ट आहे, ज्याची किंमत सुमारे 5.65 कोटी रुपये आहे.
संजय दत्त
आजकाल, KGF Chapter 2 या चित्रपटासाठी खूप प्रशंसा मिळवणारा संजय दत्त देखील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आहे. संजय दत्त रोल्स रॉयस घोस्टचा मालक आहे, ज्याची किंमत 7.55 ते 8.83 कोटी रुपये आहे.
बादशाह
बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री व्यतिरिक्त, गायक-रॅपर बादशाह त्याच्या लग्झरी जीवनशैलीसाठी देखील ओळखला जातो. बादशाहकडे एक रोल्स रॉईस आहे, ती विकत घेतल्यानंतर त्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या कारची किंमत 6.4 कोटी रुपये आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता, एका वर्षात सुमारे 4 ते 6 चित्रपटांमध्ये आपली भूमिका दाखवतो. सध्या अक्षय कुमार विमलच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारकडे रोल्स रॉइस फँटम VII आहे, ज्याची किंमत 9.50 ते 11 कोटी आहे.
भूषण कुमार
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार हे त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे कलाकारांइतकेच चर्चेत राहतात. भूषण यांच्याकडे एक रोल्स रॉयस कुलीनन आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.