इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकांमध्ये बॉलिवूडची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये दररोज नवनवीन चेहरे येत असतात. यातील काही चेहरे टिकतात तर काही गायब होतात. तर काहीजण काही चित्रपटात झळकतात, हिट होतात आणि मग गायब होतात. हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. यामी गौतमी देखील याच पठडीतली अभिनेत्री. खरं तर यामीकडे स्वतःचे स्टारडम असूनही ती तुलनेने लो प्रोफाइल भूमिका करताना दिसते.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत यामी गौतमीने अनेक गोष्टी मोकळेपणाने मांडल्या. आपल्या कामाचे मार्केटिंग करण्यास तिला नेहमी सांगितले जाते. मते, स्वतः यामीला हे फार पटत नाही. आपले काम जर पुरेसे बोलके असेल तर अशा गोष्टींची गरज भासत नाही, असे यामी ठामपणे सांगते.
एक अभिनेता म्हणून यामीने तिच्या मुंबईतील प्रवासाबद्दल सांगितले. “हे शहर तुमची परीक्षा घेते आणि अपयश आल्यास तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम करते. माझ्या आयुष्यात अशी वेळ आली होती, तेव्हा मी देखील हतबल झाले होते. तेव्हाच मी आपल्या गावी परतून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. हिमाचल प्रदेशात माझी काही जमीन आहे. चित्रपट चालला नाही तर मी शेती करावी, असे मला वाटत होते. मी आईला देखील माझ्या या निर्णयाची माहिती दिली होती.
२०१८ – २०१९ मध्ये आपल्यावर अशी वेळ आल्याचे यामी सांगते. ‘विकी डोनर’च्या यशानंतर यामीचे अनेक चित्रपट पडले. “मी माझ्या आईला सांगितले की हा चित्रपट चालला नाही तर मी परत येईन. हा सगळा काळ तुमची परीक्षा घेतो. आणि केवळ काम मिळवण्यासाठी मी पार्टीत जावे, असे मला वाटत नाही. इतरांनी काय करावे याबद्दल बोलणे मला योग्य वाटत नाही, असेही यामी सांगते.
यामी गौतमने आयुष्मान खुराना अभिनीत ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळवली. तिने गुरुवार आणि उरी: सर्जिकल स्ट्राइकसह समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक आदित्य धरसोबत यामीने लग्न केले आहे. ‘उरी’च्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. आणि तिथेच त्यांचे नाते निर्माण झाले.
Bollywood Actress Yami Gautam Big Announcement