मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रीनां झिरो फिगर किंवा चवळीची शेंग, असे म्हटले जाते परंतु त्यामुळेच त्यांची कॉपी करत आजच्या काळातील तरुणी देखील वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात, इतकेच नव्हे तर फिगर बारीक राहावी म्हणून उपवास देखील करतात. एक प्रसिध्द अभिनेत्रीने देखील आपल्या कुमार वयात असाच प्रकार अघोरी उपाय केला होता, तो तिच्या जिवावर बेतण्याची शक्यता होती. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या वेगळ्या अभिनय स्टाईलने सगळ्यांना खिळवून ठेवले आहे. तरुण अभिनेता असो किंवा सिनियर, विद्या बालनची जोडी सगळ्यांसोबत नंबर वन ठरली आहे. तसेच विद्या बालनच्या अभिनयासोबतच तिची साधी राहणी आणि साडीतील वेशभूषा ही सर्वांना आवडते. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ती झिरो फिगर आकारात दिसली नाही. तिच्या शरीरावर ती खूप आत्मविश्वासू दिसते.
एकीकडे विद्या बालन रसिकांना आवडत असतानाच दुसरीकडे तिला बॉडी शेपिंगचाही बळी व्हावे लागले आहे. तिच्या बॉडीबद्दल अनेक जण ट्रोल करताना दिसले. विद्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिच्या शरीराबद्दल अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्यानंतर तिला वाटू लागले की, आपले जाड शरीर ही सर्वात मोठी समस्या आहे. काही जण म्हणायचे, तू खूप सुंदर आहेस पण वजन जास्त आहेस. त्यामुळे ती या प्रकराचा खूप विचार करत होती. याबाबत विद्याने सांगितले होते की, ती १७ वर्षांची असताना तिला कोणीतरी दिवसातून १० लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता, असे केल्याने वजन कमी होईल असे त्याला सांगण्यात आले. मात्र विद्याने इतके पाणी प्यायल्यावर तिला उलट्या होऊ लागल्या. मळमळ, ताप अशा समस्या सुरू झाल्या. एके दिवशी त्याला डॉक्टरकडे नेण्याची वेळ आली. त्यानंतर तिने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पिणे बंद केले.