इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – अभिनयाच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री तब्बू ही कायम अग्रस्थानी आहे. तिच्या सगळ्याच भूमिकांना आजवर तिने योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे तिचे जवळपास सर्व चित्रपट हिट झाले आहेत. आता जरी तिचे फारसे चित्रपट दिसत नसले तरी प्रेक्षकांच्या मनावर आजही तब्बूच्या अभिनयाची जादू आहे. यासोबतच तब्बूचे खाजगी आयुष्य देखील नेहेमी चर्चेत राहिले आहे. तब्बूने आजपर्यंत लग्न केले नाही मात्र काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले होते. ‘हम नौजवान’ या चित्रपटातून तब्बूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. यावेळी तब्बू अवघ्या १४ वर्षांची होती. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने साकारली होती. त्यानंतर मात्र तिने मागे वळून बघितलेच नाही.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि तब्बू हे दोघेही तब्बल १० वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. त्यावेळी ते दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशिप जवळजवळ १० वर्षे सुरू असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्यामुळे हे नाते काही पुढे जाऊ शकले नाही. मात्र, त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिले असल्याचे म्हटले जाते. खरं तर नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते. पण त्याला पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. तब्बूला मात्र हे मान्य नव्हते. यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. असे असताना याबाबत त्यांनी काही खुलासा केला नाही.
काही वर्षांपूर्वी नागार्जुन यांना एका मुलाखतीदरम्यान याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी याबाबत मौन सोडले. ते म्हणाले की, तब्बू माझी फार जुनी आणि चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. आमच्या वयात बरच अंतर होते. आमच्या मैत्रीबद्दल जितकं बोललं जातं तितकं ते कमीच आहे. माझ्याकडे तिच्याबद्दल लपवण्यासारखे काही नाही. जेव्हा तुम्ही कधी तिचे नाव मला विचारता किंवा सांगता तेव्हा माझा चेहरा उजळतो. आता, मी जेव्हा या अशा गोष्टी ऐकतो किंवा सांगतो, त्यात जर तुम्हाला काही वेगळे मुद्दे काढायचे असतील तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. माझ्यासाठी ती एक सुंदर व्यक्ती आहे. त्याबरोबरच एक चांगली मैत्रीणही आहे आणि ती नेहमीच असेल”, असे नागार्जुनने म्हटले होते.
खासगी आयुष्यात काहीही असले तरी अभिनयात मात्र तब्बू कायम उजवीच आहे. तब्बूचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ‘दृश्यम १’ मध्ये तब्बूची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. तर दुसऱ्या भागाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Bollywood Actress Tabbu Love Affair Rumors Dating