इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साडी हा प्रत्येक महिलेचा विक पाँईट असतो, असे म्हणतात. विविध प्रकारच्या आकर्षक व सुंदर साड्या घेण्याची महिलांना खूपच हौस असते, भारतात मोठी कापड आणि साड्या यांना मोठी परंपरा लाभली आहे. भारतात हातमाग आणि भरतकामाचा इतिहास समृद्ध आहे.
आपल्या देशात अनेक ठिकाणे काही खास वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील विविध राज्यांमध्ये अशी अनेक शहरे आणि गावे आहेत, जी त्यांच्या खास नक्षीदार कपड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी काही शहरांच्या साड्या त्यांच्या संस्कृती आणि परंपरेमुळे देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहेत.
बॉलिवूड अनेक अभिनेत्रींना अशा साड्या आवडतात. फिल्मी दुनियेत रेखापासून ते प्रियांका, दीपिका, आलिया आणि जान्हवी कपूरसारख्या अभिनेत्रींनाही या साड्या खूप आवडतात. भारतातील विविध राज्यांतील प्रसिद्ध साड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
बांधणी साडी (भुज, गुजरात):
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला बांधणी साडी खूप आवडते, सारा अनेक खास प्रसंगी बांधणी साडीत दिसली आहे. केशरी, हिरवा, गुलाबी, लाल, पिवळा आणि निळा हे काही रंग आहेत जे सामान्यतः बांधणी कापड रंगविण्यासाठी वापरले जातात. कारण या साडीच्या फॅब्रिकची रंगरंगोटी ही सर्वात खास आहे. या साड्यांचा सर्वाधिक वापर हा गुजरात आणि राजस्थानमध्ये होत आहे, परंतु आजकाल फॅशनचा ट्रेंड पाहता भारतातील इतर राज्यांमध्ये अशा साड्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
आसामची कोरल सिल्क साडी:
हे फॅब्रिक सामान्यतः आसामच्या स्त्रिया या मेखला चादर हा पारंपारिक पोशाख बनवण्यासाठी वापरतात. आसामच्या कोरल सिल्क साडीमध्ये प्रियंका खूपच सुंदर दिसत आहे, आसामचे पारंपरिक कोरल सिल्क केवळ देशातच नाही, तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. कोरल रेशीम हे त्याच्या रंग आणि टिकाऊपणासाठी ओळखले जाते. या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी जितकी जास्त धुवाल तितकी ती प्रत्येक धुतल्यानंतर जास्त चमकते.
पैठणी साडी (येवला):
अभिनेत्री कंगना ही साडी नेसलेली दिसते. महाराष्ट्राची पैठणी साडी बॉलिवूडमधील फॅशन क्वीन्सची पहिली पसंती ठरत आहे. पैठणी साड्या नाजूक रेशमी धाग्यांनी तिरकस आणि चौकोनी डिझाईन्सने बनवलेल्या असतात. या साडीचे सौंदर्य तिच्या मोर आणि मोती किंवा रुंद अस्तरांच्या डिझाईनमुळे वाढते.
चंदेरी सिल्क (मध्य प्रदेश, बुंदेलखंड):
सुंदर साड्यांचा विचार केला तर चंदेरी सिल्क हे नाव समोर येते. हलक्या रंगात अतिशय सुंदर दिसणाऱ्या या साड्या मध्य प्रदेशात बनवल्या जातात. या साड्या सोन्याच्या नाण्यांपासून मोर आणि भौमितिक डिझाइनपर्यंतच्या आहेत. हलक्या रंगाच्या साड्या नेसायला आवडत असतील तर चंदेरी सिल्कच्या साड्या छान आहेत. मध्य प्रदेशात बनवलेल्या या साड्या सोन्या-चांदीच्या जरीच्या सुंदर कामासाठी ओळखल्या जातात.