इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज जरी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी अभिनेत्री रवीना टंडन हिने एक काळ गाजवला आहे. सुंदर तर ती दिसतेच पण आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. आजही ती अभिनय करताना दिसली तरी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती या क्षेत्रात कार्यरत आहे. अशा या गुणी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीत कुटुंबीय तसेच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्यामुळे सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
रवीना आणि तिच्या कुटुंबासाठी २०२३ हे वर्ष खास असणार आहे. रवीना लवकरच केजीएफ सिनेमाच्या तिसऱ्या भागात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्रीला सरकारकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. रवीना टंडनला २०२३ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वांनी रवीनाचं कौतुक करण्यास सुरुवात केली. पत्नीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याने पती आनंद थडाणी फारच आनंदात आहेत. सध्या सर्वत्र रवीना आणि तित्या कामगिरीची चर्चा आहे.
९० च्या दशकात असलेली रवीनाची जादू आजही कमी झालेली नाही. सध्या सर्वत्र रवीनाची चर्चा आहे. परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक चित्रपटांमध्ये रवीनाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ९० च्या दशकात चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असले तरी २००१ मध्ये आलेल्या ‘दमन’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि तिलाही ओळख मिळाली. २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘सत्ता’ या सिनेमातील अभिनयाने समीक्षकांनी कौतुक केले आहे.
एकाच वेळी तीन सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री रवीना टंडनने १९९४ या एकाच वर्षात एकाच वेळी तीन सुपरहिट सिनेमे दिले आणि तीनही वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत. अक्षय कुमारसोबत मोहरा, अजय देवगणसोबत दिलवाले आणि सलमान खान आणि आमिर खानसोबत अंदाज अपना अपना यांसारख्या सुपरहिट सिनेमांमुळे रवीना टंडन अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री झाली. एकाच वेळी तीन सिनेमे सुपरहिट देणाऱ्या रवीनाचे तीनही चित्रपट भिन्न आहेत. त्यावेळी तिच्या अभिनयाचेदेखील प्रचंड कौतुक झाले होते.
बॉलिवूडची ‘मस्त गर्ल’ अशी रवीना टंडनची ओळख आहे. वयाच्या २१ व्या वर्षी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सिनेसृष्टीत यश मिळाल्यानंतर तिने दोन मुलींना दत्तक घेतले. छाया टंडन आणि पूजा टंडन या दोन मुलांचा रवीनाने एकटीने सांभाळ केला आहे.
रवीना आज तिच्या खासगी आयुष्यात फार आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अनेक सेलिब्रिटींसोबत रवीनाचे नाव जोडण्यात आलं. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. चाहते रवीनाच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
Bollywood Actress Raveena Tondon Good News