मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मध्ये म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधना बद्दल नेहमीच चर्चा केली जाते. इतकेच नव्हे तर कोणता अभिनेता आणि कोणती अभिनेत्री जास्त मानधन घेतात ? यासंदर्भात रसिकांना नेहमीच सुद्धा असते. परंतु अभिनेत्यांचे मानधन हे अभिनेत्री अपेक्षा निश्चितच जास्त असते. मात्र काही या क्षेत्रातील काही जोड्या म्हणजेच पती-पत्नी असे आहेत की, यामध्ये पत्नीचे मानधने पतीच्या मानधन अपेक्षा निश्चितच जास्त आहे, असे दिसून येते.
बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मानधन किंवाफीमध्ये मोठी तफावत आहे. यातील अनेक अभिनेत्रींनी फीच्या असमानतेबद्दल उघडपणे बोलले आहे. मात्र, आता हळूहळू काळ बदलत असून काही महिलांना अधिक फी मिळाल्याचे दिसून आले आहे. तसेच अभिनेत्रींची लोकप्रियता आणि फी त्यांच्या पतींपेक्षा जास्त आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ
नुकतेच लग्नबंधनात अडकले. विकी कौशलने इंडस्ट्रीत प्रवेश केला तोपर्यंत कतरिनाने स्वतःचे नाव कमावले होते. कतरिना आजच्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विकी कौशल बॉलीवूडमध्ये वेगाने पुढे जात आहे पण कतरिनाच्या तुलनेत तो खूप मागे आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियंका चोप्रा एकेकाळी अनेकांच्या दिल की धडकन होती, तिने बॉलिवूडमध्ये चांगलाच ठसा उमटविला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी असो वा बॉलीवूड-हॉलिवूड प्रियांका सर्वत्र नवऱ्याच्या पुढे आहे.
ऐश्वर्या राय -अभिषेक बच्चन
सौंदर्यवती ऐश्वर्या रायने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर तिच्या अभिनयानेही लोकांची मने जिंकली आहेत. हम दिल दे चुके सनम, गुरु, धूम २ हे त्यांचे हिट चित्रपट आहेत. ऐश्वर्याची लोकप्रियता जगभरात आहे. तर अभिषेक या बाबतीत त्याच्या खूप मागे आहे.
करिना कपूर आणि सैफ अली खान
हे बॉलिवूडचे पॉवरफूल कपल आहेत. तरीही करीना इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच टशन या चित्रपटासाठी करीना कपूरने स्वतः सांगितले की, तिला सैफपेक्षा जास्त फी मिळाली आहे.
बिपाशा बसू- करण सिंग ग्रोवर
बिपाशा बसूने टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आहे. करणने काही चित्रपटात नक्कीच काम केले पण त्याला तेवढे यश मिळाले नाही. याउलट बिपाशाला चांगले यश मिळाले आहे.
भारती सिंग – हर्ष लांबाचिया
टीव्ही कलाकारांबद्दल बोलायचे तर, भारती सिंग ही टॉप कॉमेडीयन आहे. त्यांचे पती हर्ष लांबाचिया हे लेखक आहेत. भारतीसोबत लग्न केल्यानंतर तो आता तिच्यासोबत सतत शो होस्ट करताना दिसत आहे.
दिव्यांका त्रिपाठी- विवेक दहिया
दिव्यांका त्रिपाठीने अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले आहे. तिच्या पतीचे तितकेसे नाव नसले तरी दिव्यांका टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
दीपिका कक्कर – शोएब इब्राहिम
बिग बॉस 14 ची विजेती दीपिका ककर ससुराल सिमर का या मालिकेतून घरोघरी सिमरन म्हणून प्रसिद्ध झाली. दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमसोबत लग्न केले आहे.