मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील अभिनेत्री असो की अभिनेते या कलाकारांविषयी सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता वाटत असते. त्यातच त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी म्हणजे ते कोणते कपडे घालतात ? काय वेशभूषा – केशभूषा करतात ? त्यांचा बंगला कुठे आहे, त्यांची संपत्ती किती आहे ? याबाबत नेहमीच चर्चा होत असते, तसेच अनेकांना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते
बॉलिवूडची सुंदर आणि सुपर फिट अभिनेत्री मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. मलायका अरोराचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दलच नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. मलायका अरोराच्या खात्यात अनेक सुपरहिट आयटम नंबर आहेत, त्यासाठी ती भरमसाठ फी देखील घेते. मलायका अरोरा एका आयटम नंबरसाठी जेवढे फी घेते, अनेक अभिनेत्रींना संपूर्ण चित्रपटासाठी तेवढी फी देखील मिळत नाही.
एका रिपोर्टनुसार, मलायका अरोरा कोणत्याही आयटम नंबरसाठी मोठी रक्कम घेते. मलायका अरोरा एका आयटम नंबरसाठी सुमारे 1.75 कोटी रुपये घेते. मलायकाच्या फीवरून हे स्पष्ट होते की, अनेक अभिनेत्रींना संपूर्ण चित्रपटासाठी एवढी फी देखील मिळत नाही. त्याचवेळी, रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 2021 मध्ये मलायकाची एकूण संपत्ती 73 कोटी रुपये होती, तर 2022 मध्ये तिची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी रुपये आहे.
मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. मलायका अर्जुन कपूरला डेट करत असून दोघांमध्ये जवळपास 12 वर्षांचे अंतर आहे. याविषयी एका मुलाखतीत मलायका अरोरा म्हणाली, ‘घटस्फोट किंवा ब्रेकअपनंतरही महिलांचे आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या संबंधांबद्दलची काही जणांची विचारसरणी फारच स्त्रीविरोधी राहिली आहे. स्वतःहून लहान तरूणांना डेट करणे हे महिलांसाठी वाईट मानले जाते. मलायका अरोरा म्हणाली की, घटस्फोट किंवा ब्रेकअप झाल्यानंतरही महिलांना जगण्याचा अधिकार असायला हवा.
एका रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर आणि मलायका हे लग्नाची तयारी करत आहेत. दोघेही येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात. लग्न मुंबईत होऊ शकते आणि फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. मलायका लग्नात साधी साडी तर अर्जुन कुर्ता परिधान करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. त्याचबरोबर लग्नाच्या पार्टीत दोघेही वेस्टर्न आउटफिट घालतील. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
.