इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कतरिना आणि विकी कौशल हे बॉलीवूडमधली सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नापूर्वी त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा आजही कायम आहेत. त्यामुळे हे कपल कायम चर्चेत असते. गेल्यावर्षी ९ डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे दोघांनी लग्न केलं. अगदी थाटामाटात हे लग्न झालं. नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात कतरिनाने हजेरी लावली होती. यात तिने मधुचंद्र अर्थात हनीमूनबाबत केलेलं वक्तव्य देखील चांगलच गाजलं. कतरिनाने आपल्या लव्ह स्टोरीचाही ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये खुलासा केला आहे.
सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत कतरिना ‘कॉफी विथ करण ७’मध्ये पोहोचली होती. या तिघांचा ‘फोन भूत’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने कतरिनाच्या लव्हस्टोरीची कथा लीक झाली आहे. ‘कॉफी विथ करण ७ ‘मध्ये कतरिना सुहागरातपासून लव्हस्टोरीपर्यंत अनेक गोष्टींवर बोलली. खरं तर ‘कॉफी विथ करण’ या शोमधून कतरिना आणि विकी यांच्यात प्रेमाची ठिणगी पडली. या शो च्या एका सीझनमध्ये विकी कौशल सहभागी झाला होता. यादरम्यान करणने गमती गमतीत विकीला कतरिनाबद्दल छेडलं होतं. माझी आणि विकीची जोडी चांगली दिसेल, असं कतरिना म्हणाल्याचं करणने विकीला सांगितलं होतं. ते ऐकून विकी भांबावला होता. करणने हाच धागा पकडून कतरिनाला प्रश्न केला.
तुमची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली? कारण याच शोमध्ये विकीसोबत माझी जोडी चांगली दिसेल, असं तू म्हणाल्याचं मला आठवतंय आणि त्यानंतर तुम्ही लग्न केलंत, असं करणने विचारलं. यावर कतरिनाला म्हणाली, हो, मला आठवतंय मी विकीबद्दल तसं म्हणाले होते. तो किती हॉट आहे, हे माहीत नाही. पण विकी उंच आहे, त्यामुळे मी त्याच्यासोबत चांगली दिसेन, असं मला वाटलं होतं. पुढे जे काही घडलं तो एक सुंदर योगायोग होता. कारण त्यानंतर मीडियात माझ्या आणि विकीबद्दल चर्चा सुरू झाल्या, तोपर्यंत तरी आम्ही एकमेकांना डेट करत नव्हतो. आम्ही डेटींग करतोय, हे ऐकणं तेव्हा माझ्यासाठीच आश्चर्याची गोष्ट होती. स्क्रीन ऍवॉर्डमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. खरं तर विकी कधीच माझ्या रडारवर नव्हता. हे सगळं अनपेक्षित होतं. कदाचित हे माझ्या नशीबात लिहिलं असावं आणि ते व्हायचंच होतं. जोया अख्तरच्या पार्टीत आम्हाला एकमेकांबद्दल फीलिंग असल्याची जाणीव झाली आणि मग आम्ही कधी प्रेमात पडतो ते कळलंच नाही. मला तर विकीबद्दल काहीही माहित नव्हतं. मी फक्त त्याचं नाव ऐकलं होतं. पण त्याला कधी भेटले नव्हते. पण जेव्हा भेटले, तेव्हा त्याने माझं मन जिंकलं, असंही कतरिना म्हणाली.
Bollywood Actress Katrina Kaif and Vicky Kaushal Love story