त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रतारका तथा शिवभक्त सिनेतारका कंगना राणावत हिने सहकुटुंब त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. दुपारी दोन-अडीचच्या दरम्यान ती सहकुटुंब येथे आली. त्यानंतर सर्वप्रथम थेट मंदिरात दर्शनासाठी जाऊन मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी तिने अभिषेक, पूजा, आरती कोणताही धार्मिक विधी केला नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कोठी हॉल कार्यालयात तिचे स्वागत झाले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने नगरपरिषद प्रशासक तथा देवस्थानच्या सचिव डॉ. श्रिया देवचके यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विश्वस्त डॉ. देवचके, पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते. यावेळी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराची माहिती त्यांना देण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांनी कधी केला? बांधकामाला किती वर्षे लागली? याची माहिती घेऊन त्या लगेच नाशिककडे रवाना झाल्या.