इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही चाहत्यांची अत्यंत लाडकी. मध्यंतरी ती चित्रपटसृष्टीपासून लांब होती. आता पुन्हा ती सक्रिय झाली असून सध्या ती ‘लस्ट स्टोरीज २’ आणि ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची लेक निसा देखील या क्षेत्रात येते आहे. त्यामुळेच ओघाने तिला देखील पापाराझींचा सामना करावा लागतो आहे.
अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा देवगण नेहमीच चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जाते. निसा देवगण हिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर निसा देवगण हिला ट्रोल केले गेले. या व्हायरल व्हिडीओमध्ये निसाला धड चालताही येत नसल्याचे दिसते आहे. सुरक्षारक्षकांच्या मदतीने निसाला न्यावे लागत होते. या व्हिडीओ वरूनच ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
पापाराझींबद्दल काय म्हणते काजोल?
काजोल हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पापाराझींबद्दल धक्कादायक विधान केले आहे. काजोल म्हणते, निसा पापाराझींना खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने हाताळते. पण मी जर निसाच्या ठिकाणी असते तर माझी चप्पल कधीच पायातून निघाली असती. काजोलच्या याच विधानावरून तिच्यावर टीका होते आहे. पापाराझी नेहमीच निसा हिचे फोटो काढतात. गंमत म्हणजे, मी कधीच निसा हिला पापाराझी यांच्यासोबत कसे वागायचे हे सांगितले नाही, किंवा शिकवले नाही. अनुभवाने ती हे शिकली आहे.
काजोलवर टीका
काजोल हिने पापाराझी यांच्याबद्दल केलेले विधान ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. काजोल ही नेहमीच तिच्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी काजोल हिने सोशल मीडियाला रामराम केला होता. त्यानंतर परत सोशल मीडियावर काजोल सक्रिय दिसली आहे.