मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. तब्बल १० वर्षे चाललेल्या खटल्याचा आज अंतिम निकाल देण्यात आला. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एएस सय्यद अंतिम निकाल देताना म्हणाले की, पुराव्याअभावी हे न्यायालय अभिनेता सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
३ जून २०१३ रोजी जिया खान तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या घरातून सहा पानी सुसाईड नोट सापडली, जी जिया खानने लिहिलेली होती. तिच्या म्हणण्यानुसार, जियाचा बॉयफ्रेंड तथा अभिनेता सूरज पांचोलीवर अभिनेत्रीच्या हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणी २० एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश ए एस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. आणि आज विशेष सीबीआय न्यायालय जिया खान प्रकरणावर अंतिम निकाल दिला.
आईची याचिका
दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांनीही याप्रकरणी सूरज पांचोली याच्यावर आरोप केले होते. त्यानंतर, सूरज पांचोलीला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली आणि दोन आठवड्यांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर जुलै २०१४ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे गेले. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे जियाच्या आईनेही सांगितले होते. यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी फेटाळून लावली होती.
आजच्या निकालानंतर आई म्हणाली
विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालानंतर जियाच्या आईने प्रतिक्रीया दिली आहे. ती म्हणाली की, हा निकाल मला मान्य नाही. या निकालाला मी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही.
#WATCH | The charge of abetment to suicide has gone. But how did my child die? This is a case of murder…will approach the high court: Rabia Khan, Jiah Khan's mother on Sooraj Pancholi acquitted of abetment charges in suicide case pic.twitter.com/8RA7fhbPDY
— ANI (@ANI) April 28, 2023
गैरवर्तन
जिया खानच्या आईने सीबीआय कोर्टात निवेदन होते. त्यात म्हटले होते की, की सूरज हा जियावर शारिरीक आणि शाब्दिक अत्याचार करत असे. पोलीस आणि सीबीआय या दोघांनीही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत, असेही त्या म्हणाल्या. निशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला १० वर्षे पूर्ण होत आहेत.
Bollywood Actress Jiah Khan Suicide Case Verdict