नाशिक – अनेक सेलिब्रेटींचे आवडते ठिकाण म्हणून सुला विनयार्डस ख्यात आहे. आताही एका दिग्गज अभिनेत्रीने सुला विनयार्डस गाठून हॉलिडे साजरा केला आहे. पिकनिकसाठी मला अत्यंत उत्तम ठिकाण सापडल्याची प्रतिक्रीया साक्षीने दिली आहे. नाशिक शहरालगत असलेल्या सुला विनयार्डसमध्ये द्राक्षापासून वाइनची निर्मिती केली जाते. जगप्रसिद्ध सुला फेस्टही येथे आयोजित केला जातो. अनेक सेलिब्रेटींनी आजवर सुला विनयार्डसला भेट दिली आहे. त्यामुळेच सुला सतत चर्चेत असते. आता साक्षी मलिकमुळे पुन्हा एकदा सुलाची देशभरात चर्चा होत आहे. बॉयफ्रेंड आणि व्यावसायिक संतुल कटाहरा सोबत तिने गेल्या वर्षी लग्न केले आहे. विशेष म्हणजे, संतुलचा वाढदिवसच तिने सुला मध्ये साजरा केला आहे. बघा तिचे सुला मधील फोटो
https://www.instagram.com/p/CUkdiwZt0ei/?utm_source=ig_web_copy_link