गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Happy Birthday Babita Kapoor! अभिनेत्री करिना आणि करिष्मा कपूरच्या आईविषयी तुम्हाला हे माहित आहे का?

by India Darpan
एप्रिल 20, 2023 | 12:30 pm
in मनोरंजन
0
D4krbcIVUAAeqeu

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड आज ज्या टप्प्यावर पोहोचले आहे, त्यात कपूर घराण्याचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. कपूर घराण्याशी संबंधित प्रत्येकाने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. या सर्वांमध्ये, एक अशी व्यक्ती आहे जिने बॉलिवूडमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवली, परंतु कपूर कुटुंबाची सून झाल्यानंतर आयुष्यात संघर्षांची मालिका सुरू झाली. तिचे नाव आहे बबिता कपूर. प्रसिद्ध अभिनेत्री करिना आणि करिष्मा कपूरची आई.

गोरा रंग आणि मादक डोळे, जो कोणी त्यांना पाहतो तो त्यांच्या सौंदर्याने वेडा होतो. होय, आम्ही बोलतोय ७० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री बबिता कपूरबद्दल. बबिता यांचा जन्म २० एप्रिल १९४८ रोजी पाकिस्तानातील कराची येथे एका सिंधी कुटुंबात झाला. बबिता आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बबिताला नेहमीच अभिनेत्री व्हायचे होते. बबिताने १९६६ मध्ये ‘दस लाख’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट काही अप्रतिम चमक दाखवू शकला नसला तरी बबिताच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. बबिताला खरी ओळख ‘राज’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते.

१९७१ मध्ये बबिता यांच्या ‘कल आज और कल’ या चित्रपटातून रणधीर कपूरसोबत दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. काही रिपोर्ट्सनुसार, कपूर कुटुंबाला रणधीर आणि बबिता यांच्या नात्याला मान्यता नव्हती, पण ते त्यांच्या मुलाच्या आग्रहापुढे झुकले. आणि १९७१ मध्ये दोघांनी पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न केले.

लग्नानंतर बबिताने चित्रपटात काम करणे बंद केले, कारण त्यावेळी राज कपूर यांचा आदेश होता की लग्नानंतर कपूर घराण्याच्या सुनेने चित्रपटात काम करू नये. दुसरीकडे, लग्नानंतर रणधीर कपूरचे करिअर ठप्प झाले, त्यामुळे त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. रणधीर कपूरच्या या व्यसनामुळे बबिता खूप अस्वस्थ झाली होती. आणि आता तिने दोन मुलींनाही जन्म दिला होता. बबिताने आपल्या मुली करिष्मा आणि करीना यांच्या चांगल्या भविष्यासाठी रणधीरचे घर सोडणे चांगले मानले. आणि ती मुलींसह वेगळी झाले. मात्र, तिने रणधीरला घटस्फोट दिला नाही.

Bollywood Actress Babita Kapoor Happy Birthday

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाच्या रुग्णांमध्ये २० टक्के वाढ; सर्वांनीच काळजी घ्या

Next Post

धक्कादायक! जिवंत शेतकऱ्याला ठरवले मृत… सरकारी योजनेपासूनही ठेवले वंचित… सरकारकडून थट्टा होत असल्याने तीव्र संताप

India Darpan

Next Post
IMG 20230420 WA0260 1 e1681972368552

धक्कादायक! जिवंत शेतकऱ्याला ठरवले मृत... सरकारी योजनेपासूनही ठेवले वंचित... सरकारकडून थट्टा होत असल्याने तीव्र संताप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011