इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आमिषा पटेल. ‘कहो ना प्यार है’ हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर जरी ती फारशी चित्रपटात दिसत नसली तरी आमिषा कायमच चर्चेत असते. आताही ती पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलेली आहे. आता निमित्त आहे ते अमिषा हिच्या लग्नाचं. आमिषा हिने स्वतःच आपल्याला कोणासोबत लग्न करायचे आहे, हे सांगितले आहे. अभिनेत्री आमिषा पटेलला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझसोबत लग्न करायचं आहे.
पन्नाशी गाठल्यानंतर आमिषाला टॉम क्रूझसोबत लग्न करायचं असल्याने चाहते तिला ट्रोल करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आमिषा पटेल हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची मोठी चाहती आहे. काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या आमिषाने नुकतीच ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. याच पुरस्कार सोहळ्यात तिने टॉम क्रूझसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली.
स्क्रीन शेअर करावी
६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अमिषाला प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या अभिनेत्रीची जागा घ्यायची वेळ आली तर कोणत्या अभिनेत्रीची जागा घेशील? या प्रश्नाचं उत्तर देत अमिषा म्हणाली, मी कोणत्याही अभिनेत्रीची जागा घेऊ शकते. पण हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने माझ्यासोबत स्क्रीन शेअर करावी. आमिषा पुढे म्हणाली की, हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची मी मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे.
घरात पोस्टर्स
आमिषा म्हणते की, “हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची मी मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तरुणपणी माझ्या खोलीत मी टॉम क्रूझचे पोस्टर्स लावले होते”. आमिषाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. टॉम क्रूझबद्दल बोलताना अमीषाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.
आगामी प्रोजेक्ट
‘गदर’ या सिनेमासाठी आमिषा ओळखली जाते. अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. आता पुन्हा एकदा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. ‘गदर २’ मध्ये आमिषा आणि सनी देओल पुन्हा एकदा तारा आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. उर उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळणार आहे. ११ ऑगस्ट रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Bollywood Actress Amisha Patel Will Marriage