इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री आमिषा पटेल त्या चित्रपटानंतर चांगलीच चर्चेत होती. तिचे चाहते देखील चांगलेच वाढले होते. मात्र, काही हिट चित्रपट दिल्यानंतर ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. त्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होती. अशा या आमिषाने नुकताच तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमधला आमिषाचा बोल्ड व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन
अभिनेत्री आमिषा पटेलचा ९ जून रोजी वाढदिवस होता. ‘गदर २’ हा चित्रपट येऊ घातल्याने आमिषाने तिचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. नाइट क्लबमधील तिच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आमिषा मित्रांबरोबर डान्स आणि धमाल करताना दिसते आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओत तिने ‘कहो ना प्यार है’च्या टायटल ट्रॅकवर ठेका धरला. तिच्याबरोबर तिचे मित्र-मैत्रिणीही डान्स करताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
काळ्या रंगाचा आउटफिटमध्ये आमिषा खूप सुंदर दिसत होती. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली आमिषा लवकरच ‘गदर २’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Bollywood Actress Ameesha Patel Bold Video Viral