मुंबई – बॉलिवूडमध्ये करिअर करताना काही अभिनेत्यांना खूप वेळ लागतो, सहाजिकच चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे उशीरा लग्न झाल्यामुळे किंवा त्यांच्या जोडीदारामधील वयातील फरकामुळे ते वयाच्या 45 नंतरच वडील झाले आहेत. अभिनेता संजय दत्तपासून शाहरुख खानपर्यंत, चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पिता होण्याचा आनंद मिळाला आहे. जाणून घेऊ या कोण आहेत ते अभिनेते-
सैफ अली खान
भूत पोलिस या नव्या चित्रपटात दिसलेला अभिनेता सैफ अली खान या वर्षी चौथ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी करीना कपूर खानने वयाच्या 39 व्या वर्षी 21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसरा मुलगा जहांगीर अली खानला जन्म दिला. त्यांचा दुसरा मुलगा झाला तेव्हा सैफ अली खान 50 वर्षांचा होता. तसेच सैफला त्याची पत्नी अमृता सिंगपासून सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.
संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त वयाच्या 51 व्या वर्षी वडील झाला. त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्त हिने 2010 मध्ये जुळ्या शाहरान आणि इकराला जन्म दिला. याआधीही संजय दत्तला त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मापासून मुलगी त्रिशला दत्त झाली असून तिचे वय सध्या 33 आहे. संजयची पहिली पत्नी रिचाचे ब्रेन ट्यूमरमुळे 1996 मध्ये निधन झाले.
आमिर खान
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने 2005 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले. या लग्नाच्या 6 वर्षानंतर तो 2011 साली मुलगा आझादचा पिता झाला. त्यावेळी तो 48 वर्षांचे होता. याआधी आमिरला रीना दत्ताशी पहिल्या लग्नापासून इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत.
अक्षय कुमार
2012 मध्ये बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय हा मुलगी नितारा हिचा पिता झाला. यावेळी अक्षयचे वय 45 वर्षे होते. निताराच्या आधी अक्षयला एक मुलगा आरव असून त्याचा जन्म 2002 मध्ये झाला.
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान वयाच्या 48 व्या वर्षी सरोगसीद्वारे तिसऱ्यांदा वडील बनला. त्यांचा मुलगा अबरामचा जन्म 2013 मध्ये झाला. याशिवाय शाहरुखला आर्यन हा मुलगा आणि सुहाना ही मुलगी आहे.