इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातून सुरू झालेली डेट लग्नापर्यंत पोहचली. बॉलीवूडमधील आजही हॉट जोडी असलेले कतरीना कैफ आणि विकी कौशल हे कपल. हे दोघे एकमेकांत चांगलेच रमलेले आजवर आपण पाहिले आहेत. यांच्या लग्नाला आता १ वर्ष पूर्ण होईल. विकी कतरिनाचे कौतुक करताना सर्वत्र दिसतो. तर कतरिना नवऱ्याच्या एका सवयीला जाम वैतागली असल्याचे समोर आले आहे.
विकीने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने याबाबत खुलासा केला आहे. माझी बायको माझ्या या एका सवयीमुळे वैतागली आहे. तिने लाख प्रयत्न केलेत पण माझी ही सवय गेली नाही, असं त्याने म्हटलं आहे. सोशल मीडियावर विकीला फॉलो करणाऱ्यांना विकीची एक सवय चांगलीच ठाऊक असेल. विकी अनेकदा पंजाबी गाण्यावर लिपसिंक करतानाचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. विकीची हीच गोष्ट कतरिनाला आवडत नाही. ‘असे व्हिडीओ अपलोड करू नकोस, अशी विनंती माझी पत्नी मला करत असते. पण मी कंट्रोल करू शकत नाही. एक दिवस ती सुद्धा माझं कौतुक करेल, अशी आशा करतो, ‘असं विकीने असाच एक व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
विकी आणि कतरीना ही जोडी बॉलीवूडमधील हॉट जोड्यांपैकी एक मानली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच विकी कौशल आणि कतरिना कैफने धूमधडाक्यात लग्न झालं होतं. यांच्या लग्नाला आता १ वर्ष पूर्ण होईल. कतरिनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर लवकरच ती सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. तिचा ‘फोन भूत’ हा सिनेमा गेल्या महिन्यातच प्रदर्शित झाला. विकीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Bollywood Actor Vicky Kaushal Actress Katrina Kaif Married Life