मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की त्याने त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत गुपचूप एंगेजमेंट केली आहे आणि जून महिन्यात तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या बातमीनंतर त्यांच्या लग्नाशी संबंधित माहिती मिळण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. त्याचवेळी आता करणच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. सनी देओलचा लाडका लेक कधी बोहल्यावर चढणार हे पाहूया.
देओल कुटुंबाला त्यांचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करणे आवडत नाही, त्यामुळे ते त्यांचे कौटुंबिक कार्य देखील खाजगी पद्धतीने करतात. करणची एंगेजमेंट देखील फक्त कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत झाली आणि आता देओल कुटुंबीय लग्नासाठीही तेच नियोजन करत आहेत.
देओल कुटुंबाकडून लग्नाची तारीख आणि विधींबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु १६ जूनपासून द्रिशा आणि करणच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. १८ जूनला शिख पद्धतीने करण विवाह बंधनात अडकणार आहे.
असे म्हटले जात आहे की हे एक खाजगी लग्न असेल, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र सहभागी होतील. करण मुंबईतच त्याची दीर्घकाळाची मैत्रीण द्रीशासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.
दुसरीकडे, करणबद्दल सांगायचे तर, त्याने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट सनी देओलनेच दिग्दर्शित केला होता. मात्र, हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. दुसरीकडे, सनी देओलबद्दल बोलायचे तर त्याचा ‘गदर २’ हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसणार आहे.
Bollywood Actor Sunny Deol Son Karan Wedding