मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट पठाण मुळेही त्याची चर्चा होत असते. शाहरुखची नेमकी संपत्ती किती असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत…
शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. आपल्या अभिनयासह लग्झरी लाइफस्टाइलसाठी तो सधअया ओळखला जातो. शाहरुखजवळ 660 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. तो बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानच्या तुलनेत शाहरुखकडे दुप्पट प्रॉपर्टी आहे.
शाहरुखच्या लग्झरी प्रॉपर्टीविषयी सांगायचे म्हणजे, त्याच्याजवळ 3आलिशान बंगल्यांशिवाय अलिबाग येथे एक शानदार फार्महाऊस आहे. या चारही प्रॉपर्टींची एकुण किंमत 660 कोटी रुपये आहे. याशिवाय शाहरुख अनेक सोर्समधून पैसा कमावतो. संपत्तीच्या बाबतीतही तो किंग म्हणावा असाच आहे. शाहरुखला त्याच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी फक्त 50 रुपये मिळाले, आता त्याची एकूण संपत्ती 5 हजार कोटी इतकी आहे. बॉलीवूड स्टार्समध्ये शाहरुखच्या लक्झरी लाईफला तोड नाही. मुंबईत 200 कोटींचा बंगला, 14 कोटींची कार, 2 कोटींचे घड्याळ, लोखोंचे शूज, लंडन, दुबईमध्ये बंगले आहेत. शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. प्रोडक्शन हाऊस, IPL क्रिकेट टीम अशा विविध माध्यमातून शाहरुख कोट्यावधीची कमाई करत आहे.
मुंबईतील शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याचे नाव पुर्वी व्हिला व्हिएना होते. हा बंगला एका किकू गांधी या पारसी गुजराती व्यक्तीकडून शाहरुखने खरेदी केला होता. शाहरुखने 1995 मध्ये 15 कोटीत खरेदी केला होता. आता या घराची किंमत 200 कोटींहून अधिक आहे.शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे असलेला ‘मन्नत’ हा आलिशान बंगला. हा बंगला एखाद्या राजमहलापेक्षा कमी नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये हा बंगला खूपच फेमस आहे.
अनेक चाहते मन्नत बाहेर उभं राहून फोटो देखील काढतात. वास्तुविशारद-डिझायनर कैफ फकीह यांच्या सहकार्याने गौरी खानने स्वतः मन्नतचे डिजाईन तयार केले. सी व्ह्यूव असलेला हा बंगला सर्व लक्झरी सोई सुविधांनी सुसज्ज आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याची तुलना अंबानींच्या घराशी केली जाते. या बंगल्यात अनेक बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, वॉक इन वॉर्डरोब, लायब्ररी आणि पर्सनल हॉल देखील आहे.
शाहरुख खान अनेक बंगल्यांचा मालक आहे. त्याचे लंडनमध्येही एक अतिशय आलिशान बंगला आहे. 2009 मध्ये त्याने हा बंगला खरेदी केला होता. शाहरुख खानने सेंट्रेल लंडनमधील पॉश एरिया असलेल्या पार्क लेन हा बंगला खरेदी केला आहे. त्याच्या या अपार्टमेंटची किंमत 20 मिलियन पाँड 190 कोटी आहे.
त्याचबरोबर दुबईतील पाम जुमेराह येथे त्यांचा एक लक्झरी व्हिला देखील आहे. या व्हिलाची किंमत 100 कोटी रुपये आहे. आणि या व्हिलाचं नाव जन्नत आहे. सप्टेंबर 2007 मध्ये दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखील यांनी हा व्हिला शाहरुखला भेट म्हणून दिला होता. दुमजली घर असून 14,000 वर्ग फूटांच्या या फ्लॉटमध्ये 8500 वर्ग फूट हा सिग्नेटर व्हिला उभा आहे. यामध्ये स्विमिंग पूल, प्रायव्हेट बीच आहे. खान फॅमिली येथे सुटी एन्जॉय करायला येत असते.
अलिबाग येथे किंग खानचे हॉलिडे होम आहे. मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागच्या समुद्रकिनारी हे फार्महाऊस आहे. डिसेंबर 2017 मध्ये इनमक टॅक्स विभागाने शाहरुखचे फार्महाऊस सील केले होते, त्यावेळी याची किंमत 250 कोटी रुपये काढण्यात आली होती. 20 हजार वर्गफुटात असलेल्या या फार्महाऊसमध्ये शाहरुखने आपला 51 वा वाढदिवस साजरा केला होता. यामध्ये स्विमिंग पूल, प्रायव्हेट बीच आणि प्रायव्हेट हॅलिपेडसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
लिमोजिन एखादे ब्रॅण्ड नसून लग्झरी कारचे एक क्लास आहे. ही गाडी स्पेशल ऑर्डर देऊन बनवली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाडीचे इंटेरिअरसुद्धा आपण आपल्या पसंतीने डिझाइन करुन घेऊ शकतो. शाहरुखने ही कार स्पेशल ऑर्डर देऊन बनवली होती. शाहरुखने लिमोजिनचे नाव ‘रॉयल इस्टेट बाय शाहरुख खान’ असे ठेवले आहे. या कारमध्ये दोन केबिन आहेत. उन्हासाठी कारमध्ये सनडेक आहे.
याशिवाय शाहरुखच्या कलेक्शनमध्ये मर्सडीज-बेंज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या कार आहे. सोबतच बुगाती वेरोन ही आलिशान गाडी त्याच्याजवळ असून त्याची किंमत 14 कोटी रुपये आहे. तसेच 4.1 कोटी रुपयांची रोल्स रॉयस कूप, 4 कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, मर्सिडीज बेंझ एस 600 गार्ड ही 2.8 कोटी रुपयांची आहे. त्याचप्रमाणे 56 लाख रुपयांची Audi A6 आणि 1.3 कोटी रुपयांची BMW 6 सिरीज, BMW 7 सिरीजची किंमत 2 कोटी रुपये आहे
शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन ही एखाद्या आलिशान महालाला तोड देईल अशीच आहे. शाहरुख शूटिंग करत असताना ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये राहतो ती व्हॉल्वो BR9 मॉडेल आहे. जी खास शाहरुखसाठी प्रसिद्ध व्हॅन डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. शाहरुख व्यतिरिक्त दिलीपने अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅन्स डिझाईन केल्या आहेत. या व्हॅनिटी व्हॅनचे इंटिरिअर जबरदस्त आहे. या व्हॅनचा फ्लोअर पूर्णपणे काचेचा आहे. ‘आय पॅड’वरून ही व्हॅन चालवता येणार आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पॅन्ट्री विभाग, वॉर्डरोब विभाग, एक विशेष मेकअप चेअर आणि स्वतंत्र क्यूबिकल टॉयलेट आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटी रुपये आहे.
शाहरुखचे उत्पन्न स्त्रोत :
– शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात बिझी स्टार्सपैकी एक आहे. शाहरुख खानचे कमाई माध्यम एकमेव अभिनय क्षेत्र नाहीय. तो निर्माता आहे, याशिवाय टीव्ही होस्ट करुनही कमाई करतो.
– शाहरुख आयपीएल आणि अनेक ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट्समध्ये बिझी असतो. शाहरुख जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
– याशिवाय तो अवॉर्ड फंक्शन होस्ट करणे, लग्न, पार्टी आणि इतर इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मन्स देऊन कमाई करतो.
– शाहरुख दोन प्रॉडक्शन कंपन्यांचा मालक आहे. ड्रीम्ज अनलिमिटेड आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत तो चित्रपटांची निर्मिती करतो.
– शाहरुख अनेक रेस्तराँ चेन्सचा मालक आहे. दिल्लीतील ‘फॅट खान बर्गर’ चेन त्याच्या मालकिची आहे.
– शाहरुख आयपीएलच्या कोलकाता नाइट राइडर्स टीमचा को-ओनर आहे. याशिवाय त्याने एक फुटबॉल टीम (न्यू डेल्ही एंजेल्स) खरेदी केली आहे.
– शाहरुख ख्रानचा परफ्यूम ब्रॅण्ड, With Love from Shah rukh आणि Shah rukh Khan Seduction बाजारात लोकप्रिय आहे.
लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख कोट्यवधी रुपये मानधन घेत असतो. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका लग्नात डान्स परफॉर्मन्ससाठी शाहरुखने 8 कोटी रुपये घेतले होते. तर मुंबईत फक्त अर्ध्या तासासाठी व्हीआयपी प्रेजेंस देण्यासाठी किंग खानला 5 कोटी रुपये दिले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखला दरवर्षी 250 लग्नांचे आमंत्रण मिळत असते. त्यापैकी तो फक्त 10 लग्नात सहभागी होत असतो.
Bollywood Actor Shahrukh Khan Property and lifestyle