इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर सुरुवातीपासूनच बॉयकॉटचे संकट घोंघावत होते. त्यानंतर चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद निर्माण झाला. एका बाजूला चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे ही घरघर म्हणजे सगळ्यांचे टेन्शन वाढवणारी ठरते आहे. दरम्यान, चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या मानधनावरून आता चर्चा रंगल्या आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख-दीपिकासह जॉन अब्राहमचा एक वेगळा लूक दिसतो. त्यावरून हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. शाहरुखने या चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर शाहरुखच्या तुलनेमध्ये दीपिका आणि जॉनचं मानधन फारच कमी आहे. एका वृत्तानुसार शाहरुखने या चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेमध्ये हे शाहरुखचं मानधन खूप आहे. दीपिकाने ‘पठाण’साठी १५ तर जॉनने २० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. म्हणजेच मानधनाच्या बाबतीतही शाहरुख ‘किंग’ खान आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1616379981822676992?s=20
शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1612683599312224256?s=20
Bollywood Actor Shahrukh Khan Pathan Movie Fees