मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – अभिनेता शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. त्यातच आता शाहरुखने एक मोठी खुशखबर दिली आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून त्यावर त्याचा फोटो आहे. त्यावर लिहिले आहे, ‘SRK प्लस Coming Soon’ शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘कुछ कुछ होता है, OTT की दुनिया में.’ अभिनेत्याने त्याच्या पोस्टसोबत स्पष्टपणे काहीही लिहिले नसले तरी सलमानने अभिनंदन करत हे गुपित जाहीर करून टाकले आहे.
बॉलीवूडचे मोठे कलाकार ओटीटीवर काम करताना दिसत आहेत. त्यातच आता किंग खानने त्याच्या खास शैलीत ओटीटी अॅप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर शाहरुखचे अभिनंदन करताना सलमान खानने लिहिले की, ‘आजची पार्टी तुझ्या बाजूने. तुझ्या नवीन OTT अॅप SRK+ साठी अभिनंदन.
https://twitter.com/iamsrk/status/1503604476934242308?s=20&t=_GjhkiKKsf1Ukp-0L6MCIw
तर चित्रपट निर्माता अनुराग कश्यप एका OTT अॅपसाठी शाहरुख खानसोबत सहयोग करत आहे. त्याने लिहिले की, ‘शाहरुख खानसोबत त्याच्या नवीन OTT अॅप, SRK+ वर सहयोग करण्याचे स्वप्न साकार झाले आहे.’
त्याचप्रमाणे करण जोहरने शाहरुख खानचे अभिनंदन करताना म्हटले की, शाहरुखची या वर्षातील सर्वात मोठी बातमी. आता OTT चा चेहरा बदलणार आहे. मी खुप उत्सुक आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान लवकरच OTT अॅप लॉन्च करण्याची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SRK+ अॅप हे Disney+ Hotstar सह सहकार्याचा विस्तार आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1503997457302114304?s=20&t=_GjhkiKKsf1Ukp-0L6MCIw