इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वाची लोकप्रियता पाहता येथील सगळेच कलाकार अल्पावधीत लोकप्रिय होतात. त्यातही काही जण घरातल्या मोठ्यांच्या बळावर येथे स्थिरावतात. तर काही कठोर परिश्रमाने त्या स्थानी पोहोचतात. तर या कलाकारांना प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळते. इतकं की हे कलाकार हे आपल्या घरातीलच कोणी आहे, असा इतरांचा समाज होतो.
मनोरंजन विश्वात कलाकारांच्या भूमिकेच्या प्रेमात पडण्याचा हक्क प्रेक्षकांचा असतो. त्यामुळे अमुक एक कलाकार प्रत्येकाच्या मनात खास असतो. चाहत्यांसाठी कलाकाराची प्रत्येक भूमिका महत्त्वाची असते. असाच काहीसा प्रसंग बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या बाबतीत घडले आहे. शाहरुखने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ या प्रश्न-उत्तरांच्या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने थेट त्याला त्याच्या नवजात लेकीचं नाव ठेवण्याची विनंती केली. त्याच्या या प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरुखने ट्विटरवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी एका चाहत्याने त्याला म्हटलं होतं की, “आम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल त्याचं नाव तूच ठेव. प्लीज मला दोन्ही नावं सांग.” तेव्हा शाहरुखनेही या ट्वीटला उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, “आधी तुम्हाला बाळ होऊ दे मग त्याचं नाव ठरवू. पण तुझं आणि तुझ्या पत्नीचं अभिनंदन. तंदुरुस्त रहा.” आता शाहरुखच्या या चाहत्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आता पुन्हा एकदा त्याने ट्विट करत त्याच्या लेकीसाठी नाव सुचवण्याची विनंती किंग खान केली.
शाहरुखने आज त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ‘आस्क एसआरके’ हे प्रश्न उत्तरांचं सेशन घेतलं. या सेशनच्या वेळी त्याच्या या चाहत्याने ट्वीट करत त्याला म्हटलं, “आज सकाळी नऊ वाजता आम्हाला मुलगी झाली. तिचं नाव तू ठेवायचं. प्लीज तिचं नाव ठेव.” त्याच्या या ट्विटला शाहरुखनेही आनंदाने उत्तर दिलं. या ट्वीटला रिप्लाय देत शाहरुख म्हणाला, “किती छान! देवाचे आशीर्वाद तिच्यावर कायम राहोत.” आता त्याने दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.
Bollywood Actor Shahrukh Khan Answer to Fan