इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाहरुख खान हा बॉलीवूडमधील मोठ्या अभिनेत्यांपैकी एक. मागे मुलाचे प्रकरण आणि आता शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटावरील बॉयकॉटचे संकट असे सगळे सुरू असताना पुन्हा शाहरुख नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेनजी यांचं ३० डिसेंबर रोजी पहाटे निधन झालं. १०० व्या वर्षी त्यांनी अहमदाबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले आणि त्यांनी आईचे अंत्यविधी केले. पंतप्रधानांना मातृशोक झाल्यानंतर अनेक राजकारणी आणि कलाकारांनीही त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यात अभिनेता शाहरुख खाननेही ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. पण या ट्विटमुळे शाहरुख नेट युझर्सच्या निशाण्यावर आला आहे.
भारताचे पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन ३० डिसेंबरला पहाटे झालं आणि त्याच दिवशी १२ वाजेपर्यंत त्यांचे अंत्यसंस्कार झाले. पण, शाहरुखने ३१ डिसेंबर रोजी ट्विट केलं. “पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेनजी यांच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतोय. माझ्या कुटुंबाच्या प्रार्थना सर तुमच्या पाठीशी आहेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असं ट्विट शाहरुखने सकाळी केलं. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुला दोन दिवसांनी आठवण झाली, भगवान तुला सदबुद्धी देवो”, असं एका युझरने म्हटलंय.
तर नशेतून आज जाग आली का अशीही टीका एका युझरने केली आहे. आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या आईचे निधन झाल्याचे तुम्हाला फारच लवकरच कळले. लाज वाटते तुमच्यासारख्या लोकांची, ज्यांना तुम्ही राहता त्या देशात काय चालले आहे हे देखील माहीत नाही,” असं आणखी एका युझरने म्हटलंय. तर कोणाबद्दल लिहिताय ते वयाने मानाने मोठे आहेत देशाच्या पंतप्रधान यांचा एकेरी उल्लेख शोभतो का ? असा संतप्त सवाल विचारत नेटकऱ्यांनी शाहरुख खानला ट्रोल केलं आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1609052315369230337?s=20&t=FQUwcuX2BokWm0nF2R5vRA
Bollywood Actor Shah Rukh Khan Troll After Tweet
PM Narendra Modi Mother Condolence