शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गौरीशी लग्न करण्यासाठी काहीही… शाहरुख खानने बदलले चक्क आपले आपले नाव… असा झाला उलगडा

ऑगस्ट 28, 2023 | 1:28 pm
in मनोरंजन
0
gauri shahrukh khan1 e1679332666303

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटातून उत्तम अभिनय करत गेली अनेक वर्षे अभिनेता शाहरुख खान प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. क …क… किरण म्हणत त्याने म्हटलेले संवाद आजही प्रसिद्ध आहेत. रोमान्सकिंग हे बिरुद मिरवणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमॅंटिक आहे हे त्याच्या आणि गौरी खानच्या लव्हस्टोरीकडे बघून आपल्याला जाणवतं. किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ चित्रपटापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांच्या प्रेमकहाणीचे काही किस्से उघड होत आहेत. गौरीसाठी काहीही असं म्हणत शाहरुखने आपले नाव बदलल्याचे समोर आले आहे.

मध्यंतरीच्या काही कौटुंबिक घटनांनंतर शाहरुख आपल्या संसारात तसेच कामात रमला असल्याचे चित्र आहे. अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी या दोघांकडे बॉलीवूडमधील एक आदर्श जोडपं म्हणून बघितलं जातं. शाहरुखकडे फेम, ग्लॅमर काही नसताना गौरीने त्याची साथ दिली आणि तब्बल ३० वर्षं तिने ती साथ निभावली. शाहरुखनेही तिला कसलीच कमतरता भासू दिली नाही. गौरीचे आई वडील आणि घरची इतर वडीलधारी मंडळी प्रथम या लग्नाच्या विरोधात होते. पण नंतर मात्र त्यांनी या लग्नाला होकार दिला, लग्नासाठी शाहरुख खानने चक्क स्वतःचं नावदेखील बदललं होतं. लेखक, अभिनेता आणि शाहरुखचा जवळचा मित्र मुस्ताक शेख याने त्याच्या एका पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

म्हणून बदलले नाव
आर्य समाजाच्या पद्धतीने लग्नगाठ बांधण्यासाठी शाहरुखने त्याचं नाव ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ असं ठेवलं होतं. शाहरुखने हेच नाव का निवडलं याबाबतीत या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. या नावाच्या माध्यमातून शाहरुखने दोन जुन्या सुपरस्टार्सना मानवंदना दिली आहे. शाहरुखच्या आजीला तो जितेंद्रसारखा वाटत असल्याने त्याने हे नाव निवडले, आणि टुल्ली हे अभिनेते राजेंद्र कुमार यांचे खरे आडनाव होते. यामुळेच त्याने ही दोन नावं जोडून लग्नासाठी ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ हे नाव लावायचं ठरलं.

गौरीनेही बदलले नाव
आधी हिंदू रितीरिवाजानुसार आणि मग मुस्लिम परंपरेनुसार शाहरुख आणि गौरीचं लग्न पार पडलं. इतकंच नव्हे तर त्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊनही लग्न केलं. शाहरुखने लग्नासाठी नाव बदलल्याचं पाहून मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करताना गौरीनेही ‘आयेशा’ हे नाव लावलं होतं. या दोघांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख केवळ २६ वर्षांचा होता अन् गौरी केवळ २१ वर्षांची. शाहरुख आणि गौरी यांची तीनही मुलं हे दोन्ही धर्मांचं पालन करतात.

Bollywood Actor ShahRukh Khan Name Change Gauri Marriage
Arya Samaj

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यंदा रक्षाबंधन कधी साजरे करायचे? ३० की ३१ ऑगस्ट? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

Next Post

नेमकं काय चाललं आहे? सुप्रीम कोर्टाचा गुजरात हायकोर्टाला सवाल… बघा, असं काय घडलं…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Court Justice Legal

नेमकं काय चाललं आहे? सुप्रीम कोर्टाचा गुजरात हायकोर्टाला सवाल... बघा, असं काय घडलं...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011